Press "Enter" to skip to content

फ्रान्स ने अल कायदा चा अड्डा उडवला

50 जिहादी ठार झाल्याची सूत्रांची माहिती.

बमाको (पॅरिस)

फ्रान्सच्या वायू दलाने आफ्रिकन देश मालीमध्ये सक्रिय असलेल्‍या अल-कायदाशी संबंधित दहशतवाद्यांवर हवाई हल्‍ला केला. फ्रान्सच्या वायू दलाने मिराज फाईटर जेट आणि ड्रोन विमानांमधून मध्य मालीमध्ये क्षेपणास्त्र डागले. यामध्ये जवळपास ५० दहशतवादी ठार झाले आहेत. फ्रान्सने बुर्कीन फासो आणि नाइजरच्या सीमेवर शुक्रवारी हल्‍ला केल्‍याची माहिती समोर येत आहे.

फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ले यांनी माली यांनी सांगितले की. ३० ऑक्‍टोबर रोजी मालीमध्ये फ्रान्सच्या हवाई दलाने आक्रमक कारवाई केली. ज्‍यामध्ये ५० जिहादी ठार झाले आहेत. या दरम्‍यान मोठ्‍या प्रमाणात शस्‍त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.

या ठिकाणचे माली सरकार इस्‍लामिक दहशतवाद्यांचा सामना करत आहे. संरक्षण मंत्र्यांच्या माहितीनुसार हवाई हल्‍ल्‍यामध्ये ३० मोटरसायकलीही नष्‍ट झाल्‍या आहेत.

ड्रोनव्दारे मिळालेल्‍या माहितीनुसार, जेव्हा मोठ्या संख्येने मोटरसायकलवरून लोक तीन देशांच्या सीमेवर हजर होते. तेव्हा काही जिहादी झाडांचा आसरा घेवून लपू लागले आणि वाचण्याचा प्रयत्‍न करू लागले. त्‍यावेळी फ्रान्स वायू दलाने मिराज फायटर जेट आणि ड्रोन तिथे पाठवले. यावेळी दहशतवाद्यांवर क्षेपणास्‍त्रे डागली गेली. ज्‍यामध्ये दहशतवादी ठार झाले.

सेनेच्या प्रवक्‍ते फ्रेडरिक बार्बी यांनी सांगितले की, ४ दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे. त्‍यांच्याकडे असलेली शस्‍त्रे तसेच सुसाईड जॅकेट जप्त करण्यात आले आहेत. जिहादींचा हा समुह सेनेच्या तळावर हल्‍ल्‍याच्या तयारीत असल्‍याची माहिती त्‍यांना मिळाली होती. त्‍यावरून ही कारवाई करण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.