सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे,(नंदकुमार मरवडे)
सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने रोहे तालुक्यातील पुगांव या गावी बांधण्यात आलेल्या बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा विधान परिषद आ.अनिकेत तटकरे यांच्या शुभहस्ते ता.१५ रोजी संपन्न करण्यात आला.
मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या पुगांव या गावी ग्रामस्थांनी खा.सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांच्याकडे बसस्थानक व्हावे यासाठी केलेल्या मागणीचा विचार करून सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानचे माध्यमातून येथे सुंदर असे बसस्थानक उभारण्यात आले आहे. याचा लोकार्पण सोहळा तरुणांचे आशास्थान व विधान परिषदेचे आ.अनिकेत तटकरे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आला.
यावेळीसर्वश्री नारायणधनवी, रामचंद्र चितळकर,बाबुराव बामणे, वसंत भोईर, प्रकाश थिटे, मनोज शिर्के, नरेंद्र जाधव, नाना शिंदे, मंगेश पोटफोडे, विश्वनाथ धामणसे, सुधीर बारस्कार, संजय मोते,संजय मांडलूस्कर, उत्तम बाईत, संदीप जाधव, प्रविण धामणसे, श्रीकांत चव्हाण, संजय सानप, महेंद्र पानसरे, महेश पवार,विजय राजीवले,राकेश लोखंडे, पुगाव सरपंच सौ.नेहा बबन म्हसकर, उपसरपंच आदिती झोलगे, प्रमोद म्हसकर,गणेश म्हसकर, रचना कळमकर, नीलम कळमकर,नंदू कलमकर,राम धुपकर व सर्व ग्रामस्थ, महीला व युवक उपस्थित होते.
आदी उपस्थित होते. येथे जूने बसस्थानक मोडकळीस आले होते.त्यामुळे गावातील प्रवास करणा-या प्रवासी वर्गाला उन्हातान्हात व भर पावसात ताटकळत उभे राहण्याची वेळ येत असे तर आज सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानचे माध्यमातून बसस्थानकाचा प्रश्न सोडविल्याने संपूर्ण ग्रामस्थांनी प्रतिष्ठानचे आभार व्यक्त केले आहेत.






Be First to Comment