Press "Enter" to skip to content

मांडला ते महालुंगे रस्ता बनला मृत्यूचा सापळा : वाहनधारकांचा जीव धोक्यात

सिटी बेल लाइव्ह / रायगड -अमूलकुमार जैन #

मुरूड तालुक्यातील मांडला महाळूनगे रस्त्याची जागोजागी खाच खळगे व खड्डे असून मांडला ते महालुंगे दरम्यान असणारा मार्ग जणू मृत्यूचा सापळा बनला असुन या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरीकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
मांडला ग्रामपंचायत हद्दीतील मांडला ते महालुंगे बुद्रुक दरम्यान असलेल्या समशानभूमी नजीक असणाऱ्या रस्त्यांनजिकच नदी आहे. एक ते दीड वर्षांपूर्वी या नदीच्या संरक्षित भिंतीचे काम करण्यात आले होते. त्याच प्रमाणे या रस्त्यावर शेतातील पाणी नदीत जाण्यासाठी एक मोरी असून ती पूर्णपणे गाळ माती यांनी भरली असल्याने बाजूला असणाऱ्या शेतातील पावसाचे पाणी हे रस्त्यावर येत आहे.त्या ठिकाणी जवळपास अर्धा फूट उंचीचे खड्डा असून त्याची लांबीसुद्धा दहा फुटाच्या आसपास आहे.या खड्ड्यातून येणारी वाहने होडीसारखी हेलकावे घेत असते. त्याच रस्त्याच्या पुढे रस्त्यावरून पाणी जाऊन रस्ता निमुळता होत गेला आहे.त्या रस्त्यावरून सन2018च्या पावसात काकळघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुरेश ठाकूर यांच्या मालकीची स्कुल व्हॅन ही भर पावसात वाहून नदीत गेली होती.मात्र सुदैवाने त्या व्हॅनमध्ये शालेय विद्यार्थी नसल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी होताहोता वाचली.मात्र व्हॅनचालक सुरेश ठाकूर यांना स्थानिक ग्रामस्थांच्या साहाय्याने वाचविण्यात यश आले होते.आज त्या घडीला दोन वर्षे होत आली तरी रस्त्याचे काम ग्राम सडक योजनेतून मंजूर होऊन वर्ष होत आले तरी कामाची सुरुवात करण्यात आली नाही.
या महिन्यात कोसळलेल्या पावसात या मार्गाची मोठी दयनीय अवस्था उडाली असून वाहन चालकांची वाहन चालवताना मोठी दमछाक होत असून तारेवरची कसरत करत वहाने चक्क हेलकांडे घेत आहेत. तर मांडला स्थानकापासून ते काकळघर पर्यन्त जाणाऱ्या या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत.यामुळे या ठिकाणी अनेकवेळा छोटेमोठे अपघात देखील झालेले आहेत.
सदर रस्ता हा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असल्यामुळे ह्या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी जिल्हा परिषदेत पत्रव्यवहार करणार तसेच आमदार महेंद्र दळवी यांना सुद्धा या रस्त्याच्या दुरुस्ती बाबत निवेदन देणार असल्याचे मांडला ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता पालवणकर यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.