Press "Enter" to skip to content

रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षपदी हार्मेश तन्ना

सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर)

सामाजिक कार्यात सदैव आघाडीवर असणार्‍या येथील रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षपदाचा कार्यभार हार्मेश तन्ना यांनी स्विकारला. सचिवपदी कल्पेश परमार तर खजिनदार म्हणून जितेंद्र बालड यांनी कार्यभार स्विकारला. कोरोनाच्या महामारीमुळे ऑनलाईन मिटींगच्या माध्यमातून झालेल्या पदग्रहण सोहळ्यास भावी प्रांतपाल पंकज शहा आणि आमदार प्रशांत ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
         मावळते अध्यक्ष डॉ. प्रकाश पाटील यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हार्मेश तन्ना  यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना नुतन अध्यक्ष हार्मेश तन्ना यांनी नवीन संकल्पना विषद केली.  फॉरेस्ट विभागाकडून गाडेश्‍वर-पनवेल येथे जागा देण्यात आली असून तेथे रोटरी फॉरेस्ट ही संकल्पना रुजविण्यात येणार आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयास शवपेट्या देण्यात येणार असून ऑपरेशन थिएटरसाठी लागणारे किमती सामानही देण्यात येणार आहे. यावर्षी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे. याप्रसंगी भावी प्रांतपाल पंकज शहा आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपापली मनोगते व्यक्त करुन रोटरी क्लबच्या वाटचालीत काही मदत-सहकार्य हवे असल्यास ते करण्यासाठी नेहमीच पुढे राहणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला असिस्टंट गव्हर्नर डॉ. हेमंत भालेकर यांची सन्माननीय उपस्थिती लाभली. क्लबचे अध्यक्ष हार्मेश तन्ना यांनी यावेळी आपली नवीन कार्यकारिणी जाहिर केली. मावळते अध्यक्ष डॉ. प्रकाश पाटील यांनी गतवर्षात केलेल्या महत्वपूर्ण प्रोजेक्टची माहिती पीपीटीच्या माध्यमातून सर्वांना दिली.  या बहारदार पदग्रहण सोहळ्याचे सुत्रसंचालन क्लब फस्ट लेडी ध्वनी तन्ना यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.
           

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.