पनवेल पुरवठा कार्यालयात दलाला कडून कमी उत्पदनाचे रेशन कार्डचे वाटप, यात अधिकारीही सामिल : भरत पाटील
सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । प्रतिनिधी । 🔶🔷🔶
पनवेल तालुक्यात काही दलाल ( एजन्ट ) तहसिल कार्यालयातील पुरवठा , सेतू व संगणक विभागातील कर्मचा-यांच्या मदतीने , रेशनकार्डातील उत्पन्न कमी करून , कमी उत्पन्नाचे रेशनकार्ड देणे तसेच बायोमेट्रीक करून बारकोड नंबर देत आहेत. दोन दलालांच्या हातात रेशन कार्डचा कोटा दिल्याचे समजते तर हे दलाल पुरवठा कार्यालयातील रजिस्टरवर रास्त रेशन दुकानदारांच्या नोंदीही करत आहेत यात मायाही जमा करत आहेत तेव्हा अशा अधिका-यावर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी शिवसेना पनवेल संघटक व रास्त धान्य दुकान व किरकोळ राँकेल असोसिएशन अध्यक्ष भरत पाटील यांनी पनवेल तहसिलदार यांच्याकडे लेखी निवेदनाने केली आहे.

पनवेल तालुक्यात व तहसिल कार्यालयात कार्यरत आहेत वास्तविक पहाता पुरवठा विभागातील कर्मचा – यांना रेशन कार्डातील उत्पन्न कमी करून व कमी उत्पन्नाचे रेशनकार्ड देण्यांचा अधिकार नाही रेशनकार्ड धारकांनी त्याबावत रितसर तहसिलदार कार्यालयात अर्ज करून , तहसिलदारांनी शेरा मारून अर्ज चौकशीसाठी तलाठी – सजा यांचेकडे पाठविणे व ग्रामीण भागात गावातील व शहरी विभागात वार्डातील पंचाच्या समक्ष पंचनामा करून प्रस्ताव नियमानुसार कार्यालयात प्राप्त झाल्यानंतर रेशनकार्डातील उत्पन्न कमी करून व कमी उत्पन्नाचे अथवा उत्पन्नानुसार रेशनकार्ड देणे बाबात कारवाई करणे आवश्यक आहे .
पनवेल तालुक्यातील दुकानदारांच्याकडे यावावत चौकशी केली असता असे कळते की मार्च २०२० ते ऑक्टोवर २०२० पर्यत रेशनकार्डातील उत्पन्न कमी करून व कमी उत्पन्नाचे अनेक रेशनकार्ड देण्यात आलेले आहेत तसेच रेशनकार्डातील उत्पन्न कमी करून देण्यासाठी व कमी उत्पन्नाचे रेशनकार्ड बनवून देण्यांसाठी काही दलाल ( एजंन्ट ) पुरवठा , सेतू व संगणक कार्यालयातील कर्मचा-यांना चिरीमिरी देवून त्वरीत काम करून घेतात, दोन दलाल शासनाच्या रजिस्टरमध्ये नोंदही करताना दिसून येतात यात अधिकारीही सामिल असून दलाल हजारो रूपए घेवून मालामाल झाले आहेत यात अधिका-यानी माया जमविणायात काही कमी नाही. याची चौकशी होवून अधिका-यावर कडक कारवाई करण्यात यावी नपेक्षा आम्हाला वरिष्ठांकडे दादा मागण्याची तयारी रास्त भाव धान्य दुकानदार व किरकोळ राँकेल विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष भरत पाटील यांनी केली आहे. याच्या काँपी रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी यांनाही दिल्या आहेत.








Be First to Comment