सिटी बेल लाइव्ह । पनवेल । 🔷🔶🔷
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल ,जिल्हा रायगड व रायगड जिल्हा परिषद अलिबाग ,शिक्षण विभाग यांच्या वतीने सामाजिक शास्त्रे व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या समन्वयाने
“मैत्री भूगोलाशी ” हा नाविन्यपूर्ण उपक्रम दि .23/ 10/ 2020 ते दि. 12 /11 /2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने राबवला जात आहे.
भूगोल विषयातील कठीण संकल्पना स्पष्ट होऊन विद्यार्थ्याने भूगोल विषयाचा ही आवडीने अभ्यास करावा. यासाठी सहज व सोप्या या मार्गाने ऑनलाईन पाठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी DIET रायगड चे सामाजिक शास्त्र विभागाचे प्रमुख श्री. संतोष दौंड व विषय सहाय्यक सौ. सोनल गावंड यांनी जिल्ह्यातील शिक्षकांना या उपक्रमात समाविष्ट केले आहे .अध्ययन निष्पत्ती वर आधारित पाठ ‘आडायट पनवेल’ या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनपर्यंत पोहोचविण्याचे काम आय.सी.टी. विभागाचे विषय सहाय्यक श्री. गणेश कुताळ व श्री. राकेश अहिरे हे पहात आहेत. यातील एक विशेष बाब म्हणजे शिक्षकांप्रमाणे विद्यार्थ्यांनाही तांत्रिक तीन दिवस मार्गदर्शन करून तयार करण्याचे सुंदर काम यांनी केले आहे.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रायगड च्या प्राचार्या चंद्रकला ठोके यांच्या प्रेरणेतून, ज्येष्ठ अधिव्याख्याता श्री. सुभाष महाजन यांच्या मार्गदर्शनाने व कर्जत ग.शि.अ आणि अधिव्याख्याता श्री. संतोष दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. तांत्रिक बाबींचे नियोजन ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. संजय वाघ व अधिव्याख्याता राजेंद्र लठ्ठे यांच्या सहकार्याने पूर्ण झाले.
या उपक्रमात ज्योत्स्ना बाक्रे, सारिका पाटील, भाग्यश्री केदार, जयश्री मोहिते, सारिका रघुवंशी ,नम्रता पानसरे ,विद्या म्हात्रे ,विभावरी सिंगासाने ,कुसुम हिंगे ,अश्विनी थोरात ,श्रद्धा आंबूर्ले व प्रशांत दळवी या सर्व शिक्षकांच्या उत्कृष्ट पाठाची मेजवानी विद्यार्थ्यांना मिळत आहे. त्याचबरोबर भूगोलातील क्लिष्ट संकल्पना स्पष्ट होऊन चाकोरीबाहेर विचार करण्याची दिशा मिळणार आहे.







Be First to Comment