सिटी बेल लाइव्ह / नागोठणे(महेश पवार) :
केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत जिंदल माऊंट लिटेरा झी स्कूलने १०० टक्के निकाल राखला आहे. या परिक्षेत विज्ञान शाखेत कुमारी दीपशिखा सिंग हिने ८७. २ टक्के गुण मिळवित प्रथम क्रमांक मिळविला. तर कुमारी. अवंती थळे हिने ८४.६. टक्के गुणांसह द्वितिय क्रमांक मिळविला. तर कुुमारी खुशी पांडे हिने ६०.४% गुण मिळविले तर कुमारी प्रिती राजभर हिने ६०.८% गुण मिळविले.
वाणिज्य शाखेत कुमार दीपांजन करमाकर याने ८७.२ % गुण मिळवित प्रथम क्रमांक मिळविला. कुमार सौरव सिंग याने ६७% गुण मिळवुन दुसरा तर कुमारी शिवानी नेगी हिने ६६.२ % गुण मिळवित तिसरा क्रमांक मिळविला. तर कुमारी झैनाब अहमदाबादवाला हिने ६१. २ % गुण मिळविले. सर्व
यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्राचार्या श्रीमती सविता शर्मा यांनी अभिनंदन केले तसेच सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकवृंदांचेही आभार मानले तसेच विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.






Be First to Comment