सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी । 🔷🔶🔷
पनवेल तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.नवीन पनवेल खांदा कॉलनी येथील आगरी शिक्षण संस्थेच्या माध्यमिक व उच्चमाध्यमिक विदयालयाचे प्राचार्य पंकज भगत यांची पनवेल तालुका अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल पनवेल तालुका मुख्याध्यापक संघांचे माजी अध्यक्ष व भारतीय मानव विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नंदकुमार जाधव यांच्या हस्ते भगत सरांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सदर प्रसंगी आगरी शिक्षण संस्थेच्या पदाधीकारी श्रीमती श्रुती म्हात्रे तसेच भारतीय मानव विकास संस्थेचे विश्वस्त अतुल वाणी, सुरेश जाधव व कृष्णा भालेराव हे उपस्थित होते नंदकुमार जाधव यांनी तालुका कार्यकारिणीच्या सर्व नवनिर्विचीत पदाधिकारी यांनाही मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.






Be First to Comment