तालुक्यासाठी थोडी खुशी थोडा गम
सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)
रोहे तालुक्यात आज केवल १ पाँझिटिव्ह रूग्ण आढळल्याने रोहे आढळल्याने कोरोना महामारीच्या बाबतीत रोहेकरांसाठी ही बातमी थोडी दिलासा देणारी असली तरी कोरोना बाबतीत थोडी खुशी थोडा गम असल्याचे दिसून येत आहे.
तालुका प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज तालुक्यात १ पाँझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण पाँझिटिव्ह रूग्ण संख्या ही २९२ वर पोहोचली आहे.त्यापैकी २०५ जणांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ८२ जणांवर उपचार करण्यात येत आहेत.तालुक्यात रूग्णसंख्या बरी होण्याची संख्याही चांगली असल्याने तालुक्यासाठी ही बाब निश्चितच समाधानकारक ठरली असली तरी नागरिकांनी आपले दैनंदिन व्यवहार करताना सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचे व प्रशासनाचे नियम पाळणे गरजेचे असल्याचे तसेच कोरोना संदर्भात काही लक्षणे आढळल्यास आपला आजार लपवून न ठेवता शासकीय यंत्रणेच्या निदर्शनास आणून आपले उपचार करून घ्यावेत जेणेकरून संभाव्य संक्रमणाचा धोका त्वरीत टळला जाईल अशाप्रकारचे अवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.







Be First to Comment