Press "Enter" to skip to content

ह.भ .प. दगडु लाड यांचे अल्पशा आजाराने निधन

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔶🔷🔶

नागोठण्याजवळील हेदवली (ता.रोहा) येथील ह.भ.प.दगडु धोंडु लाड (वय ८६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

ह.भ.प. दगडु लाड यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य हे वारकरी सांप्रदयामध्ये घालवले. रोह-सुधागड तालुक्यातील वारक-यांची आंळदीपर्यंत जाणा-या पायीवारी दिंडीची सुरुवात करण्यात दगडु लाड यांचा मोलाचा वाटा होता. वयाच्या ८६ व्या वर्षीही त्यांच्यामध्ये अजुनपर्यंत पायी वारीला जाण्याची एक जिद्द मनामध्ये होती. संपुर्ण रोहा तालुक्यामध्ये होणा-या किर्तनांमध्ये ते चोपदाराची भुमिका चांगल्या पद्धतीने बजावत होते. वारकरी सांप्रदयामध्ये तसेच सामाजिक कार्यामध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा. पंरतु अल्पशा आजाराने ऐन दस-याच्याच दिवशी त्यांच्यावर काळाने घाळा घातला. लाड यांच्या जाण्याने वारकरी सांप्रदयात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अंत्य यात्रेला वारकरी सांप्रदयातील तसेच सामाजिक व राजकिय क्षेत्रातील मोठा जनसमुदाय जमला होता. लाड यांच्या पश्चात त्यांची पत्नी, पाच विवाहित मुले, सुना ,नातवंडे, पतवंडे असा मोठा मित्र परिवार आहे.

कै.ह.भ.प.दगडु लाड यांचे दशक्रीया विधी मंगळवार दि. ३ नोव्हेंबर व उत्तरकार्य शुक्रवार दि. ६ नोव्हेंबरला हेदवली येथे होणार असल्याचे लाड कुंटुबियांकडुन सांगण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.