Press "Enter" to skip to content

खांब-कोलाड नाक्याला आले जत्रेचे स्वरुप : लाँकडाऊन इफेक्ट

सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)


दि.१५ जुलै मध्य रात्री पासून ते २४ जुलै या कालावधीत रायगड जिल्ह्यात पुन्हा लाँकडाऊन सुरू होणार असल्याने जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी खांब व कोलाड नाक्यावर दोन दिवस अक्षरक्ष: माणसांची जत्राच भरली होती.
रोहे तालुक्यात जवळ जवळ तीनशे पाँझीटिव्ह रूग्ण सापडल्याने तालुक्यात नागरिकांमध्ये भितीदायक वातावरण पसरले आहे.जनतेच्या सुरक्षिततेचे द्रुष्टीने शासन काळजी घेताना दिसत आहे. त्यामुळेच तर रोहे शहरात गेली दहा दिवस कडक असा लाँकडाऊन ठेवण्यात आला होता. तिच परिस्थिती जिल्ह्यातील काही तालुक्यात देखील होती.परंतू जिल्ह्यातील कोरोना पाँझीटिव्ह रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता पुन्हा एकदा संपूर्ण जिल्ह्यात लाँकडाऊनची गरज प्रशासनाला वाटल्याने दि.१५जुलै मध्यरात्रीपासून ते २४ या कालावधीत जिल्ह्यात लाँकडाऊन पुकारल्याने जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी खांब व कोलाड नाक्यावर नागरिकांनी अक्षरक्ष: मोठीच गर्दी केली होती.यावेळी नाक्यावर वाहनांचीही मोठी रहदारी दिसून येत होती.
या गर्दीमुळे कोरोनाची महामारी जणू काही संपलीच आहे या अविर्भावित जो तो आपापले व्यवहार करीत असताना दिसत होता.किराणा दुकान, भाजीवाले,बिअरबार,दवाखाने,बँका,
मेडिकल आदी ठिकाणी फार मोठी गर्दी केली होती.सध्या कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचे कडक नियम पाळले जात असताना येथे मात्र नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरक्ष:फज्जाच उडविला असल्याचे दिसून आले.
तब्बल दहा दिवसांचा लाँकडाऊन पुकारल्याने पावसापाण्याच्या दिवसात जीवनावश्यक वस्तूंचा साठा असणे गरजेचे असल्याने नागरिकांनी स्वतःच्या व परिवाराचे अन्नपाण्याची व्यवस्था करावी तसेच अडचणीच्या काळात गाठीला पैसा असावा तसेच परिवाराचे आरोग्य चांगले रहावे म्हणून किराणा दुकान, बँका, मेडिकल व दवाखाने आदी ठिकाणी नागरिकांनी कोरोना महामारीची तमा न बाळगता मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.या गर्दीमुळे अक्षरशः खांब व कोलाड नाक्याला जणू जत्रेचेच स्वरूप आले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.