Press "Enter" to skip to content

गुंडगे – कर्जत येथील जागृत श्री सोमजाई माता मंदिर

होम – हवन करताना देवीने दर्शन दिल्याची आख्यायिका ! 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । भिसेगाव – कर्जत । सुभाष सोनावणे । 🔷🔶🔷

कर्जत तालुक्यातील गुंडगे गावातील नवसाला पावणारी देवी व भक्तांच्या पाठीशी उभी रहाणारी माता म्हणून प्रसिद्ध असलेली श्री सोमजाई मातेच्या मंदिरात दर्शनासाठी अनेक भक्त येत असून त्याची ख्याती दिवसेंदिवस वाढत आहे . नवरात्री उत्सवात नऊ दिवस पूजा – अर्चा करण्यात आली , तर नवव्या दिवशी केलेल्या नवचंडी यज्ञात मातेने अग्निरूपात दर्शन दिल्याने भक्तांत आनंदाचे वातावरण असून आम्ही धन्य झालो , आम्हाला मातेने दर्शन दिले , असा दावा केला जात आहे.

ही माता स्वयंभू असून या देवीची आख्यायिका अशी की , पूर्वी या ठिकाणी एक साधू येत असत , त्या जागेवर हे साधू ध्यानस्थ बसून तपश्चर्या करत असताना या मातेने त्यांना दृष्टांत दिला होता , तसेच ब्रिटिश काळामध्ये मुंबई – पुण्याचा मध्य असलेले कर्जतमधील गुंडगे परिसरात रेल्वेचे काम चालू असताना रेल्वेच्या कामात असंख्य अडचणी येत होत्या . तेथे काम करणाऱ्या कामगारांना साप व विंचू चावण्याचे प्रकार घडत होते , त्यामुळे कामगार भयभीत होत असत , त्यावेळी कामावर देखरेख करणारे मुकादम भोसले यांनी येथील ग्रामदेवतेस प्रार्थना केली व आमच्याकडून काही चूक घडत असेल तर आम्हाला साक्षात्कार दे , अशी विनवणी केली . तेंव्हा त्याच रात्री मुकादम भोसले यांच्या स्वप्नात येऊन श्री सोमजाई मातेने दर्शन देऊन सांगितले की , मी ज्या ठिकाणी काम चालू आहे , त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली आहे , मला बाहेर काढून माझ्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा , माझा जिर्णोद्धार करावा . भोसले यांनी लागलीच मातीचा ढिगारा साफ करून देवीची सुंदर मूर्ती बाहेर काढली व तेथे श्री सोमजाई मातेचे छोटेसे मंदिर बांधले .

त्या दिवसापासून मातेची मनोभावे पूजाअर्चा ग्रामस्थ करत होते .
प्रत्येक वर्षी चैत्र शुद्ध सप्तमीला श्री सोमजाई मातेचा उत्सव येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो .माता भक्तांच्या पाठीशी व नवसाला पावणारी आहे , अशी ख्याती झाल्याने भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली . त्यामुळे जीर्ण झालेले मंदिर अनेकांनी दान देऊन ग्रामस्थानीं विचार – विनिमय करून सन २००७ साली जीर्णोद्धार करण्यात आला, आज मोठया स्वरूपात मंदिर उभे झाले आहे . नवरात्रो उत्सवात मोठया प्रमाणात भक्त येऊन दर्शन घेतात . तर नवव्या दिवशी केलेल्या नवचंडी होम यज्ञात मातेने केलेल्या अग्नी कुंडात सर्व भक्तांना दर्शन देऊन कृतज्ञ केले , त्यामुळे भक्तांमध्ये आनंद पसरला , मातेने आम्हाला दर्शन दिले , आम्ही धन्य झालो , अशी प्रतिक्रिया भक्त व गुंडगे ग्रामस्थ देत आहेत . श्री सोमजाई मातेची पूजा अर्चा उत्तर भारतीय नागरिक देखील मोठ्या प्रमाणात करतात , यज्ञात दर्शन दिल्याची बातमी सर्वदूर पसरून मातेची ख्याती सर्वत्र पसरली आहे .येथे पुजारी अरविंद म्हामुनकर व दिनानाथ विश्वासे मनोभावे पूजाअर्चा व मातेची सेवा करतात .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.