कोरोना आणि प्रदूषण अशा दोंघांपासून संरक्षण म्हणून मास्क चे वाटप.
मास्क हा आताशा अत्यंत जीवनावश्य घटक झाला आहे.केवळ covid 19 नव्हे तर प्रदूषित हवेपासून देखील तो आपले रक्षण करत असतो.धूळ,वायू,केमिकल अशा घटकांचे प्रदूषण असलेल्या ठिकाणी मास्क घालण्याची सवय लावून घेणे ही काळाची गरज बनली आहे.नेमकी हीच गरज ओळखून काही सामाजिक संस्था पुढे सरसावल्या.आपल्या विभागात धूळ प्रदूषणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या गव्हाण फाट्यावर त्यांनी मास्क वाटप केले आहे.
मंगळवार दि.२७ ऑक्टो. २०१६ रोजी केअर ऑफ़ नेचर-वेश्वी,वाहतुक पोलिस शाखा-गव्हाणफाटा व साई देवस्थान,वहाळ यांच्या संयुक्त विद्यमाने गव्हाणफाटा येथे वाहतुक पोलिस व प्रवाशांना मास्क वाटपाचा स्तुत्य असा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.बडगुजर,साई देवस्थान, वहाळचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.रविशेठ पाटील व श्री. राजु मुंबईकर व केअर ऑफ़ नेचरचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Be First to Comment