प्राध्यापक हेमंत धायगुडे पाटील यांची मागणी
सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी #
बार्टी व सारथी च्या धर्तीवर आधारित भटक्या विमुक्त आणि ओबीसी समाजाच्या शिक्षणासाठी जाहीर केलेली महाज्योती ही योजना तात्काळ राज्य सरकारने कार्यान्वित करावी. महाज्योती ही योजना महाराष्ट्र शासनाने भटके-विमुक्त, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थी हित समोर ठेवून तात्काळ सुरू करावी अशी मागणी जनसेवक प्राध्यापक हेमंत धायगुडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
समाजीक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण – २०१९/प्र.क्र. १११/ मावक. दि. ०६/०७/२०१९ वरील शासन निर्णयानुसार दिनांक ८ आँगस्ट २०१९ रोजी महाज्योती या संस्थेची स्थापना केली. भटका-विमुक्त समाज हा वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेला समाज आहे. त्याचबरोबर इतर मागास वर्गीयांची हीच परिस्थिती आहे. सदर समाज अनेक वर्ष जंगलामध्ये भटकत राहणारा समूह हा मागील काही वर्षांमध्ये हळूहळू स्थिर होत आहे. मात्र या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सातत्याने होणारे दुर्लक्ष आणि त्याचा परिणाम म्हणून हा समाज आजही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलेला नाही. याचे कारण समुदायातील लोकांची उपजीविका ही मेंढपाळ, ऊसतोड कामगार, शेती कामगार,बांधकाम मजूर, शेतमजूर किंवा इतरांच्या शेतावर सालगडी म्हणून काम करणे इ. अवलंबून असल्याने त्यांच्या दोन वेळच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटलेला नसून गंभीर बनत चालला आहे.
ही संस्था स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे आपण या संस्थेची पुढील कार्यवाही करून भटके – विमुक्त, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांना महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या प्रमाणात संशोधक छात्रवृत्ती कमीतकमी 2000 रुपये विद्यार्थ्यांना प्रती वर्षी देण्यात यावी. भटके-विमुक्त, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या तिन्ही समुहांना सम पातळीवर स्वतंत्र्य जागा आरक्षित ठेवण्यात याव्यात. नपेक्षा येणार्या काळात भटके-विमुक्त, इतर मागास वर्ग आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थी व नागरिकात उद्रेक होवून रस्त्यावर उतरतील यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री व संबधित ओबीसी खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांची राहील अशी परिस्थिती उद्धभवण्यापुर्वी महाज्योती योजना सुरू करण्यात यावी अशी आग्रही मागण्या प्राध्यापक हेमंत धायगुडे पाटील यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या केली असून आपण लवकरात लवकर विद्यार्थी हिताचा निर्णय घ्याल अशा आशावाद व्यक्त केला.






Be First to Comment