🌞 आज चे राशिफल 🌞
बुधवार २८/१०/२०२०
🔴~~🔴
🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES )
( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ)
नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिका
महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा. पैशासंबंधी येणार्या अडचणी दूर होतील. आनंदाची बातमी मिळेल.
🕉 राशी फल वृषभ 🐂 ( TAURUS )
( जन्माक्षर – ई,उ,ए,ओ,वा,वी,वु,वे,वो)
नक्षत्र –🌞कृतिका,🌞रोहिणी(,🌞मृगशीर्ष
“निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या. रोख रकमेची मोठी देवघेव टाळा. कलाक्षेत्रातील लोकांना अनुकूल परिस्थिती मिळेल. “
🕉 राशी फल मिथुन👫 ( GEMINI )
( जन्माक्षर -का,की,कु,घ,ङ,,छ,के,को,हा)
नक्षत्र 🌞मृगशीर्ष🌞आर्द्रा🌞पुनर्वसु
प्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आपल्या व्यवसायात काहीतरी चांगले घडून येणार आहे. आपल्या शत्रूंवर आपला प्रबळ प्रभाव राहील.
🕉 राशी फल कर्क ( CANCER )
( जन्माक्षर ही,हू,हे,हो,डा,डी डू,डे,डो,)
नक्षत्र 🌞पुनर्वसु🌞पुष्य🌞अश्लेषा
आजअनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. आपली प्रसिद्धी वाढण्याची शक्यता आहे. आपले धाडस वाढेल. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.
🕉 राशी फल सिंह( LEO )
( जन्माक्षर -मा,मी,मू,में,मो,टा,टी,टू,टे,)
नक्षत्र 🌞मघा🌞पूर्वा.फा.🌞उ.फाल्गुनी
व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक विषयांमध्ये आपणास समर्थन मिळेल पण एखाद्याला जामीन देणे टाळा.
🕉 राशी फल कन्या 👩🦰 ( VIRGO )
( जन्माक्षर – टो,पा,पी,पू,ष,ण,ठ,पे,पो,)
नक्षत्र 🌞उ.फा🌞हस्त🌞चित्रा
आर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. व्यवसायात प्रगती कराल. स्थिती अनुकूल राहील. आरोग्य उत्तम राहील. महत्वपूर्ण कार्यात यश मिळेल.
🕉 राशी फल तुला⚖️( LIBRA )
( जन्माक्षर – रा,री,रु,रे,रो,ता,ती,तू,ते,)
नक्षत्र 🌞चित्रा🌞स्वाती🌞विशाखा
अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. भावनाशील असल्यामुळे नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशाच्या बाबतीत आपली नड भागेल.
🕉 राशी फल वृश्चिक 🦂 ( SCORPIO )
( जन्माक्षर – तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यू,)
नक्षत्र 🌞विशाखा🌞अनुराधा🌞ज्येष्ठा
कार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल. एखाद्या विशिष्ट योजनेला हातावेगळे करण्यात बराच वेळ जाईल.
🕉 राशी फल धनु🏹 ( SAGITTARIUS )
( जन्माक्षर – ये,यो,भा,भी,भू,ध,फ,ढ,भे,)
नक्षत्र 🌞मूल🌞पूर्वा.आषाढ🌞उ.षा
वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. आपल्या इच्छेवर आणि मनस्थितीवर संयम ठेवा. कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
🕉 राशी फल मकर 🐊 ( CAPRICORN )
( जन्माक्षर – भो,जा,जी,खी, खू,खे, खो,गा,गी,)
नक्षत्र —🌞उ.षा🌞श्रवण🌞धनिष्ठा
आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता. आपल्या सर्जनशील व कलात्मक वैशिष्ट्यांना प्रेरणा मिळेल.
🕉 राशी फल कुंभ 🏺( AQUARIUS )
( जन्माक्षर – गु,गे,गो,सा,सी,सू,से,सो,दा,) नक्षत्र— 🌞धनिष्ठा🌞शततारका🌞पू.भाद्र
इतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्या मित्रांना जोडणे या वेळी आपल्यासाठी फलदायी आहे. आपल्या सहकार्यांबरोबर झालेल्या मतभेदांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा.
🕉 राशी फल मीन 🦈 ( PISCES )
( जन्माक्षर – दी, दू,थ,झ,ञ,दे,दो,चा,फ,ची,)
नक्षत्र —-🌞पू.भाद्र🌞उ.भाद्रपद🌞रेवती
हुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल. जोखिम असलेले कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल.
चूक नसतांना सुध्दा
निव्वळ वाद टाळण्याकरिता
मागितलेली माफी
जीवनातील संयमाचं
एक मोठं उदाहरण ठरतं…..!
🙏 सं.अजय शिवकर 🙏
*||शुभं भवतु ||*




Be First to Comment