Press "Enter" to skip to content

रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे मढाली ग्रामपंचायत येथे 150 फळ झाडांची लागवड

सिटी बेल | कोलाड | कल्पेश पवार |

रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल व रोट्रेक्ट क्लब ऑफ रोहा सेंट्रल तर्फे
ग्रामपंचायत मढाली येथे 150 फळ झाडांची लागवड करून वृक्षारोपण करण्यात आले.

दिवसेंदिवस पर्यवरणाचा समतोल बिघड़त असून मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड़ जंगलांचा नाश या बाबी त्या साठी कारणीभूत आहेत. पर्यावरणा च्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अश्या संकटाना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावी पणे मात करावयाची असल्यास पर्यवरणाचा समतोल राखण्या साठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे आणि त्याच दृष्टिने आज रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे  ग्रामपंचायत मढाली येथे 150 फळ झाडांन ची लागवड करण्यात आली. या प्रसंगी बोलताना मढाली ग्रामपंचायत सरपंच तसेच ग्रामसेविका भिलारे मैडम यांनी रोटरी क्लब रोहा सेंट्रल चे विशेष कौतुक केले.
    

सदर कार्यक्रमा प्रसंगि रोटरी क्लब रोहा सेंट्रल चे अध्यक्ष रो. कैलाश जैन, क्लब सेक्रेटरी रो. अजित तेलंगे, डिस्ट्रिक्ट ए जी ए रो. मयुर दिवेकर, डिस्ट्रिक्ट ऑफिसर रो. गणेश सरदार, डिस्ट्रिक्ट कल्चर कमिटी चेयर रो.सूचित पाटिल, मढाली ग्रा.प.सरपंच हेमंत कडव, रोहा कृषि अधिकारी मिलिंद कुंभार, ग्रामसेवक भिलारे मैडम, रो. रूपेश पाटिल, रो. विजय दिवकर, रो. रतीश मगर, रो.सचिन कदम, रो. संदेश कापसे, रो. आमोल पाटिल, रो. सिद्धार्थ हवळ तसेच सर्व रोट्रेक्ट क्लब ऑफ रोहा सेंट्रल सदस्य व मढाली ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.