सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी #
शिवसेनेचे पदाधिकारी गजानन पाटील यांच्या आई पार्वती पिटकूर पाटील यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी मंगळवारी ( दि १४ ) सकाळी वृद्धपकाळाने राहत्या घरी दुःखद निधन झाले . त्यांच्यावर पुनाडे येथील वैकुठधाम स्मशानभुमीत शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले. जो आवडे सर्वाना तोची आवडे देवाला ! त्याप्रमाणे त्या सर्वांच्या आवडत्या काकी होत्या. त्यांनी मोठा प्रपंच चालविताना मुलांवर चांगले संस्कार दिले. त्यांना तीन मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
कोरोनाच्या महामारीत कार्यकर्ते हितचिंतकानी अंत्यसंस्कारासाठी गर्दी करू नये असे आवाहन गजानन पाटील यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केले होते. कोरोनाच्या साथीत कोणाही घरी न येता आपल्या घरीच राहून सरक्षित रहा असे आवाहन त्यांनी सोशल मिडीयावरून केले आहे.
ईश्वर त्यांना त्यांच्या चरणाशी जागा देवो, अशी गजानन पाटील यांनी ईश्वरा जवळ प्रार्थना केली सध्या कोरोना सारख्या राष्ट्रीय आपत्तीजनक परिस्थितीमध्ये अनेकांनी आम्हाला भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून आमच्या पाटील कुटुंबांचे सांत्वन केले तर काही जवळच्या नातेवाईकांनी,हितचिंतकांनी, राजकीय,सामाजिक कार्यकर्ते, यांनी व्यक्तिशः भेटण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे.परंतु आम्ही पाटील कुटुंबीय यांचेतफेॅ आतापर्यंत अनेकांनी आम्हाला संपर्क केलेला आहे त्यांचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत.






Be First to Comment