सिटी बेल लाइव्ह । उलवे । सुनील ठाकूर । 🔷🔶🔷
कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनसेवेचे कर्तव्य पार पाडलेल्या शक्तींचा सन्मान नुकताच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर रोटरी उलवे .व्यापारी एकता मित्र मंडळ व सक्सेस फाउंडेशन यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते .
यावेळी मा. जि .प .सदस्य सौ. पार्वती पाटील, स्मार्ट डायगोस्टीक सेंटर अध्यक्षा डॉ .दीपाली गोडघाटे, डॉ .सुष्मिता वहाटकर, परिचारिका नीता धुरी, उलवे मेडिकल असोसिएशन अध्यक्षा सीमा पाटील, पोलीस अधिकारी शालिनी दापोलकर, आपली बकेटलिस्ट च्या संचालिका रेखा चिरनेरकर, आशा सेविका प्रमुख आरती कोळी, निकिता पाटील, पूनम गुप्ता, निवेदिता पाटील यांना कोरोना रणरागिणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .

यावेळी रोटरी क्लब ऑफ उलवे चे संस्थापक श्री रवीशेठ पाटील, अध्यक्ष शिरीष कडू, सेक्रेटरी जयंत म्हात्रे, एकता मित्र मंडळ अध्यक्ष नितेश म्हात्रे आदींसह रोटेरियन उपस्थित होते .







Be First to Comment