उरण मधील नागरिकांचा सवाल
सिटी बेल लाइव्ह / उरण / रमेश थळी #
राज्यात कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, आरोग्यमंञी, रायगड जिल्हा पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपजिल्हा (प्रांत) अधिकारी यांनी कोरोना विषाणूंच्या पादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी प्रसार माध्यमातून जनतेला काळजी घेणे, सुरक्षित अंतर ठेवणे, काम असेल तरच घराबाहेर पडणे,माक्स लावणे,अशा अनेक वेळा सूचना देण सुरूच आहे. परंतु या घटनेला पाच महिने झाले तरी या पाश्वभूमीवर उरण मेडिकल असोसिएशन गप्प आहे.
कारण उरण शहरात सध्या १६ हॉस्पिटल,तर २० लहान क्लीनीक आहेत. त्यांचा व्यवसाय उरण तालुक्यासह शहरातील जनतेवर अलंबून आहे. आज जनतेला कोरोना रोगाचा सामना करावा लागत आहे. जनतेला हा आजार नवीन आहे या रोगाची माहिती जर मेडिकल असोसिएशन स्वतंत्र बैठक घेवून प्रसार माध्यमातून वेळोवेळी जनतेला देण्याची गरज असताना देखील ही मेडिकल असोसिएसेचे मौन का ? असा सवाल उरण तालुक्यातील जनतेतून वारंवार उपस्थित केला जात आहे.







Be First to Comment