सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । प्रतिनिधी । 🔷🔶🔷
भाजपचे माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील व नगरसेविका कुसूम पाटील यांनी कोरोना काळात येथील कोणीही व्यक्ती उपासी राहू नये ही माणुसकी जपत जीवाची पर्वा न करता निरधार, गरजू व गरीबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे व्रत घेतले होते ते अद्याप चालू असून त्यांच्या प्रयत्नातून खांद्या काँलनी मधील सुरक्षारक्षकांना ( वाँचमन) जीवनावश्यक वस्तूंचे वाटप महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलिंद सुर्यतळ यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोनाच्या संकटात सापडलेल्या जनतेला मदतीचा हात देत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून अनेकांना दिलासा देत सावरण्याचे समाजाभिमुख कार्य २३ मार्चपासून नगरसेविका कुसूम पाटील व माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांनी हाती घेतले.

शेकडो जणांना त्यांनी सर्वतोपरी मदत केली. कोरोना मदतीचा हात देत असतानाच रुग्णांना आधार देताना त्यांनी आर्थिक मदत करत हाँस्पिटलमध्ये जावून धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनां वैश्विक महामारी च्या काळात आपल्या प्राणाची पर्वा न करता आपल्या सोसायटीतील नागरिकांची सुरक्षा करणा-या खांदाकाँलनी मधील सुरक्षारक्षकांना प्रियदर्शनी सांस्कृतिक सामाजिक विकास मंडळ व देवी आंबा माता चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२०,वर्ष-१६ वे नवरात्रो उत्सवा निमित्ताने खांदा कॉलनी मधील सुरक्षारक्षक (वॉचमन) यांना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी त्यांच्या आरोग्याची चौकशी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री.निलेश बुकटे साहेब (सहाय्यक अभियंता, महावितरण कंपनी), श्री.अरुण मोरे (मॅनेजर, सातारा सहकारी बँक), श्री.रमेश शेट्ये (सातारा सहकारी बँक), श्री.लक्ष्मण जाधव (P.S.I), श्री.शंकरराव मुळीक(P.S.I.), श्री.सचिन गायकवाड (युवा समाजप्रिय नेता), विशेष अतिथी श्री.जयंत पगडे (अध्यक्ष-भारतीय जनता पार्टी,पनवेल शहर), श्री.अमरीश मोकल (सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी, पनवेल शहर) तसेच मंडळाचे व ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.







Be First to Comment