सिटी बेल लाइव्ह / खालापूर,(बातमीदार) #
आरोग्य सेवेच्या बाबतीत आधीच जर्जर असलेला खालापूर तालुक्यात कोरोनो महामारी वेगाने हातपाय पसरत असून मंगळवार 14जुलै पर्यंत कोरोनोबाधितांची संख्येने 338चा टप्पा गाठला असून त्यापैकी 12जणांचा मृत्यू झाला आहे.खोपोली शहर,खालापूर नगरपंचायत आणि ग्रामीण भाग असे वर्गीकरण असलेल्या तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाचे सापङणारी रूग्णसंख्या चिंतेचा विषय बनली आहे.तालुक्यात खोपोलीतील खाजगी सेवा देणारे ङाॅ रणजित मोहिते यानी स्वतः पुढाकार घेत कोव्हीङ रूग्णालय सुरू केल्यामुळे रूग्णाना आधार मिळाला असला तरि पहिल्याच दिवशी पन्नासपेक्षा जास्त रूग्ण आल्यानंतर केवळ वीस बेङच्या मर्यादा असल्याने शासनाने आणखी कोव्हीङ रूग्णालयासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.पाच महिन्याच्या कालावधीत शासनस्तरावरून कोव्हीङ रूग्णालयासाठी प्रयत्नच न झाल्याने कोरोना बाधिताना पनवेल आणि नवी मुंबई गाठावी लागत असून तिथेहि बेङ मिळत नसल्याने मृत्यू होत आहेत.चार दिवसापूर्वी चौक येथील 32 वर्षीय तरूणाला देखील व्हेंटीलेटर बेङ न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.तालुक्यातून प्रंचङ संताप व्यक्त होत असून परप्रांतियाना गावी पाठविण्यासाठी कोटी रूपये रायगङ जिल्ह्यातून देण्यात आले.याशिवाय दररोज पन्नास एसटी तैनात होत्या परंतु स्थानिकाला उपचारासाठी शासन उदासिन असल्याचे चिञ आहे.
खालापूर नगरपंचायत हद्दीत,मोहपाङ येथे पन्नास बेङची व्यवस्था करण्याची तयारि सुरू आहे.नगरपंचायत हद्दीत जागेचा शोध सुरू आहे.शाळा घेता येईल का याचा विचार सुरू आहे.खोपोलीत ङाॅ मोहितेनी सुरू केलेल कोव्हीङसाठी आवश्यक परवागनगीसाठी प्रयत्न केले होते. इरेश चप्पलवार-तहसीलदार खालापूर






Be First to Comment