सिटी बेल लाइव्ह / उरण ( घन:श्याम कडू )
उरण मधील प्रकल्पांतील स्थानिक कामगारांचा विविध प्रकल्पामध्ये कामानिमित्ताने कोविड-19 बाधित क्षेत्रातील येणाऱ्या व्यक्तींबरोबर संपर्क आल्याने व उरणकरांच्या हलगर्जी पणामुळे आणि शासनाच्या नियमाची नागरिकांनी पायमल्ली केल्यामुळे कोरोना व्हायरसने आपले हात-पाय तालुक्यांतील गावागावात पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जनतेमध्ये कोरोना व्हायरस बाबत जनजागृतीकरणे गरजेचे असल्याने या संदर्भात उरण तालुका प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत.
दर दोन तासाने साबणाने किंवा सॅनिटायझारने हात स्वच्छं धुवा,बघरा बाहेर पडताना नाक व तोंड झाकणारा सेफ्टी मास्कचा वापर करा, नाक डोळे, तोंडाला हाताचा स्पर्श करू नका, बाजार मधून आणलेला भाजीपाला स्वच्छं धुऊन वापरा, काम नसेलतर घराबाहेर पडू नका, गर्दीला टाळा सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा, गरम पाणी प्या, घसा ओला ठेवा, एसीचा वापर टाळा. एकमेकांपासून पांच फुटाचे अंतर ठेवा.मांस,मासे,अंडी नीट शिजून खा व शक्यतो ताजे अन्न खावे.अशाप्रकारच्या विविध सुचनांचे पालन काटेकोरपणे करावे व नागरिकांनी त्याची अमलबजावणी करावी असा संदेश गावागावांतून देण्यात आला
रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या आदेशाने व उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शना खाली नागरिकांनी कोरोना व्हायरस महामारीच्या काळात नेमके काय करावे व काय करूनये या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तथा नागरी संरक्षण दलाचे सहाय्यक उपनियंत्रक एम.के.म्हात्रे हे अभियान राबवीत असून आत्तापर्यंत त्यांनी धुतुम, रांजणपाडा, दिघोडे, गोवठणे, एकटघर, नवीनशेवा, खोपटे-बांधपाडा, वशेणी, विंधणे,नवापाडा, धाकटीजुई, बोरखार, सोनारी, सावरखार आणि टाकी आदि गावामधून कोरोना पासून कश्या प्रकारे बचाव करावा याबाबत नागरिकांना मार्गदर्शन व माहिती देत असून सुरु केलेल्या अभियानाला जनते कडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.






Be First to Comment