सिटी बेल लाइव्ह । खालापूर । विकी भालेराव । 🔶🔷🔶
भारतीय बौद्ध महासभा खोपोली शहर शाखा अंतर्गत मोहनवाडी ग्राम शाखेचे माजी अध्यक्ष दिपक हरी कदम यांचे पहाटेच्या दरम्यान आकस्मितरित्या निधन झाले आहे.
दिपक कदम हे उत्तम वायरमन म्हणून खोपोली शहरात त्यांची ओळख होती,वायरिंग च्या कामामध्ये त्यांचा मोठा हातखंडा होता, उत्तम कारागीर म्हणून देखील त्यांचा नाव होता, वायरिंग चे काम करून त्यांनी आपल्या कुरुंबाची जबाबदारी पार पाडत मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले,या सोबत त्यांनी समाजात धार्मिक काम देखील हाती घेतले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापित केलेल्या भारतीय बौद्ध महासभा मोहनवाडी शाखेचे देखील अध्यक्ष पद त्यांनी भूषविलेले होते. ग्रुप ग्रामपंचायत नडोदे चे सदस्य व पत्रकार विकी भालेराव यांचे ते मामा होते, व किरवली ग्रामपंचायत चे माजी सरपंच गोटीराम गायकवाड यांचे ते साडू होते, दिपक कदम यांच्या पश्चात वडील,पत्नी,मुलगा, मुली,जावई, नातवंडे,भाचे,भाऊ असा परिवार आहे.कदम यांच्या जाण्याने त्यांची कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
दिपक कदम यांचा पुण्यानुमोदन व शोकसभेचा कार्यक्रम शुक्रवार दि.३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मोहनवाडी,खोपोली येथे होणार आहे.







Be First to Comment