सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू)
उरणमध्ये आज पॉजेटीव्हचा आकडा कमी व घरी सोडण्यात आलेल्यांचा आकडा जास्त आला आहे, हीच एक जमेची बाजू मानली जात आहे. आज उरणमध्ये एकूण ९ पॉजेटीव्ह तर १४ जणांना घरी सोडण्यात आले आहे.
आवेडा केगाव १, हिंदू कॉलनी नागाव १, करळ १, भवरा १, नवघर २, जासई २ व कोटनाका १ असे एकूण ९ जण पॉजेटीव्ह आले आहेत. तर नवापाडा विंधणे ३, खोपटे १, मुळेखंड १, मोरा २, नागाव २, डोंगरी १, बोरी २, जासई २ असे एकूण१४ जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.
एकूण पॉजेटीव्ह ५२२, बरे झालेले ३२८, उपचार घेणारे १८१, मयत १३ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
दररोजच्या रिपोर्टमध्ये पॉजेटीव्हचा आकडा जास्त तर घरी सोडण्यात आलेल्यांचा आकडा नेहमीच कमी असायचा मात्र आज उलट होत पॉजेटीव्हचा आकडा कमी तर घरी सोडण्यात आलेल्यांचा आकडा जास्त आला आहे ही एक उरणकरांसाठी जमेची बाजू असल्याचे बोलले जाते.






Be First to Comment