Press "Enter" to skip to content

कळंबोली वसाहतीतील उद्यानाची दुरावस्था : सिडकोचे दुर्लक्ष

सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर)

सुंदर अन् स्वच्छ शहरे निर्माण करण्याचा टेंभा मिरवणाऱ्या सिडकोचा गचाळ अन् भोगलं कारभार आता चव्हाट्यावर आला आहे.कळंबोली वसाहतीमधील सेक्टर चार मध्ये असणाऱ्या सिडकोच्या उद्यानाला कोणी वाली नसल्याचे दिसून येत आहे.नागरिक व बच्चे कंपनीसाठी असणाऱ्या उद्यानात चक्क वाहने उभी केली जात असून उद्यानाची पूर्ती वाट लावून टाकली आहे.मात्र या बाबत लेखी तक्रार दाखल करूनही कारवाई केली जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.उद्यानात केलेल्या चुकीच्या बांधकामामुळे पावसाळ्यात पाणी साचून उद्यानाला तलावाचे स्वरूप येत असूनही लक्ष दिले जात नाही.त्यामुळे नागरिकांनी लावलेली झाडे जगात नाही. याबाबत कळंबोलीवासियांनी संताप व्यक्त केला आहे.         

कळंबोली वसाहती मधील सेक्टर ४ मधील असणारे सिडकोचे उद्यान बेवारस असल्यासारखे झाले आहे.या उद्यानाला काही वर्षांपूर्वी भिंतीचे काम केले होते.त्यानंतर त्यामध्ये लाखो रुपये खर्च करून नागरिकांना फिरण्यासाठी पाथ वे व बसण्यासाठी कठडे तयार करण्यात आले.तसेच लोखंडी दरवाजा बसवण्यात आला.लहान मुलांना खेळण्यासाठी काही खेळणी बसवण्यात आली. मात्र या उद्यानात कायदा व नियम धाब्यावर बसवून मंडप टाकून सार्वजनिक कार्यक्रम केले जात आहेत.त्यामुळे उद्यानात नागरिक व लहान मुले खेळण्यासाठी किंवा नागरिक चालण्यासाठी जाऊ शकत नव्हते.त्यातच उद्यानाचा लोखंडी दरवाजा चोरीला गेल्याने उद्यानात वाहन चालकांनी आपली वाहने उभी करण्यास सुरवात केल्याने नेमके उद्यान कोणासाठी आहे हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.वाहने नियम धाब्यवर बसवून उभी केल्याने उद्यानाचे वाहनतळ झालेले आहे.येथील निसर्ग प्रेमी नागरिक दरवर्षी उद्यानात सवयंस्फूर्तीने विविध झाडाची लागवड करतात.मात्र सार्वजनिक कार्यक्रम करणारे नागरिक झाडाची वाट लावून टाकतात.त्यातच पावसाळ्यात उद्यानात चुकीचे बांधकाम केल्याने तळे साचून लावलेली झाडे कुजून मरून जात आहेत. पावसाळ्यात उद्यानात गवत वाढल्याने सरपटणाऱ्या जनावरांची भीती नागरिकांना सतावत आहे.या बाबत नागरिकांना सिडको अधिकाऱ्याकडे लेखी पत्र देऊन वाहने पार्क करण्याची मागणी केली आहे.मात्र सिडको अधिकाऱ्यांना या गंभीर समस्येकडे लक्ष देण्यास वेळ नाही.याच उद्यानात दारुडे राजरोस दारू पिण्यास बसतात अन् काचेच्या व प्लॅस्टिक बाटल्या फोडून जातात.उद्यानाच्या आजूबाजूच्या सोसायटी मधील नागरिक सदरचे उद्यान दत्तक घेऊन सुशोभित करण्यास तयार आहेत.मात्र सिडको प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा रहिवाशी आरोप करीत आहेत.वसाहती मध्ये सिडकोने करोडो रुपयांची विकासाची कामे काढली आहेत.मात्र कळंबोली वासियांना कोणती विकास कामे केली जाणार आहेत याची माहितीच नाही.वसाहती मधील मध्य वस्तीमधील उद्यान लवकरच चांगले सुशोभित करावे ,त्यामधील वाढलेले गवत काढून टाकावे ,उद्यानात साचत असलेले पाणी कायमचे बंद करावे ,व उद्यानाचे झालेले वाहनतळ कायमस्वरूपी बंद करावे अशी येथील नागरिकांची मागणी असून या बाबत लवकरच कारवाई करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी नागरिक आहेत.या उद्यानावर अद्याप पर्यंत लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत मात्र ते सर्व पाण्यात गेले आहेत असा आरोप येथील रहिवाशी करीत आहेत.                 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.