सिटी बेल लाइव्ह । पनवेल । 🔷🔶🔷
खांदा कॉलनीमधील सुप्रसिद्ध व नेहमीच वर्दळ असणाऱ्या खांदेश्वर मंदिर, तलाव व उद्यान परिसरात खांदेश्वर तलावाचा गाळ काढणे, सुशोभीकरण व विसर्जन घाट करणे, संपूर्ण परिसरात सी. सी. टी. व्ही. बसविणे, जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, उद्यानात ओपन जिम व जॉगिंग ट्रक, परिसरातील नादुरुस्त पथदिवे चालू करून नवीन पुरेसे पथदिवे लावणे इत्यादी मूलभूत तसेच इतर सोयी-सुविधांची पूर्तता करण्यात यावी याकरीता मागील दोन वर्षांपासून आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको प्रशासनबरोबर अनेकदा पत्रव्यवहार करून स्वतः आमदार प्रशांत ठाकूर व प्रभाग समिती सभापती संजय भोपी सातत्याने पाठपुरावा करत आहे.
यातील बऱ्याचशा कामांच्या फाईल्स नविन पनवेल कार्यालयातून सी. बी. डी., बेलापूर कार्यालयातील अकाउंट विभागाकडे पाठविली असत्या त्या मंजूर करण्यात आल्या असून सध्या मुख्य अभियंता विभागात आहेत. मा. मुख्य अभियंता यांचेकडून स्वाक्षरी होताच सदर फाईल्स अंतरिम मंजुरीसाठी मा. व्यवस्थापकीय संचालक यांचेकडे जाणार असून त्यांची मंजुरी मिळताच टेंडर काढले जाऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. तरी सदर कामांना तात्काळ अंतरिम मंजुरी देऊन ही कामे पूर्ण करण्यात यावी अशा आशयाचे लेखी निवेदन पनवेल महानगरपालिका नगरसेवक व प्रभाग समिती ब चे सभापती संजय भोपी यांनी सिडको प्रशासनातील मा. व्यवस्थापकीय संचालक, मा. मुख्य अभियंता, मा. अधीक्षक अभियंता तसेच मा. कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.
सदर कामांस लवकरात लवकर सुरुवात करून स्थानिक नागरीकांची होत असलेली गैरसोय टाळण्याची विनंती यावेळी भोपी यांनी केली.







Be First to Comment