सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी । 🔷🔶🔷
पनवेलमधील अबोली महिला रिक्षा संघटनेच्या सदस्यांना बँक ऑफ इंडियाचे अरुण भोनकर यांनी बचत गट स्थापण्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. अबोली महिला रिक्षा संघटनेच्या सदस्यांनी बचत गट स्थापण्याविषयी इच्छा संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांच्याशी बोलून दाखविल्यावर नेहमीप्रमाणेच कार्यतत्परता दाखवत शैलेश माळी यांच्या माध्यमातून त्यांनी बँक ऑफ इंडियाचे अरुण भोनकर यांच्याशी संपर्क साधला. अरुण भोनकर यांनीही त्याला लगेच प्रतिसाद देत मार्गदर्शन करण्याचे कबूल केले.
त्यानुसार पनवेल येथील प्रिंट पॉईंटच्या कार्यालयात छोटेखानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अरुण भोनकर यांनी बचत गट म्हणजे काय ? तो कसा स्थापन करायचा तसेच त्याचे भविष्यातील फायदे सविस्तरपणे महिलांना विषद केले.
बैठकीनंतर अबोली महिला रिक्षा चालक संघटनेच्या उपाध्यक्षा शालिनी गुरव , खजिंदार ललिता राउत , सह सचिव सुनीता जाधव व सर्व सदस्य
यांनी अरुण भोनकर यांचे आभार मानले.








Be First to Comment