सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
कोरोना कोविड १९ चा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात होऊ लागला आहे. सर्व हॉस्पिटल फुल झाले आहेत. तसेच उरणमध्ये ऑक्सिजन (प्राणवायू) नसल्याने पेशंटची अवेहलना होत होती. परंतु अडचण लक्षात घेत जेएनपीटीने ही सोय करण्याचे मान्य केले आहे. तरी जेएनपीटी प्रशासनाने ही सोय एक दोन दिवसांत द्यावी. जेणेकरून पेशंटला त्याची आता तातडीने गरज आहे. आज या कारणामुळेच एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन(प्राणवायू) ची सोय कधी पासून सुरू होते याकडे उरणकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामध्ये बळी जाणाऱ्यांचा आकडा वाढू लागला आहे. कोरोनाचे पेशंट एवढे झाले आहेत की हॉस्पिटलमध्ये पेशंट ठेवायला जागाच शिल्लक राहिली नाही एवढी भयानक परिस्थिती ओढावली आहे. उरणमध्ये ही याचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यात दम लागणारे पेशंट जास्त आहेत. परंतु त्यांना ऑक्सिजन उरणमध्ये नसल्याने पेशंट पनवेलला पाठवावे लागत आहेत. पनवेललाही ऑक्सिजन पुरवठा देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे उरणच्या पेशंटला रुग्णवाहिकेतून पनवेलवरून परत उरणला पाठविले जाते. अशाच एका पेशंटची अवेहलना झाली. सदर पेशंटला उरणहून पनवेलला पाठविले त्या ठिकाणी ही सोय नसल्याने परत उरणला पाठविण्यात आले. त्यानंतर पुन्हा पेशंटला पनवेलला नेण्यात आला. या धावपळीत पेशंटची प्रकृती बिघडल्याने अखेर त्याला मृत्यूने गाठत आज त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही गैरसोय त्वरित दूर व्हावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत.
उरणला जेएनपीटीने बेडची व्यवस्था केली परंतु त्यासाठी लागणारे डॉक्टर, नर्स, ऑक्सिजनचा पुरवठा व पेशंटला पिण्यासाठी व अंघोळीसाठी गरम पाणी आदी सुविधांची गरज आहे. याबाबत संतोष पवार यांनी खासदार सुनील तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, प्रांत अधिकारी नवले आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्याशी संपर्क साधून येथील परिस्थितीचे गांभीर्याने विचार करण्यात यावा अन्यथा ऑक्सिजन अभावी पेशंटचा मृत्यू होऊन बळींचा आकडा अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जेएनपीटी चेअरमन संजय सेठी यांच्याबरोबर चर्चा करून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिल्यावर चेअरमन सेठी यांनी ऑक्सिजन(प्राणवायू) पुरवठा करण्यास संमती दर्शविली आहे. ऑक्सिजन(प्राणवायू) चा पुरवठा करण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागणार असल्याचे समजते.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून त्यामध्ये दम लागणे म्हणजे ऑक्सिजन(प्राणवायू) ची कमतरता जास्त प्रमाणात जाणवत आहे. यामुळे उरणमध्ये ऑक्सिजन(प्राणवायू) ची व इतर लागणाऱ्या गोष्टींची ही अत्यंत तातडीची गरज आहे. तरी जेएनपीटी प्रशासनाने या ऑक्सिजन(प्राणवायू) व इतर गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी ताततडीने कार्यवाही सुरू करून ते पूर्णत्वास न्यावेत अन्यथा ऑक्सिजन(प्राणवायू) अभावी पेशंटला जीवाला मुकावे लागण्याची शक्यता जास्त दिसत आहे.
Be First to Comment