सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
सुधागड तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक वाहतूक, रहदारी व दळणवळणाच्या मुख्य रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान नागरिकांना मोठ्या त्रास व अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सुधागड तालुक्यातील चंदरगाव ते ढोकळेवाडी रस्त्याची पुरती दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती व्हावी अशी मागणी सुधागड तालुका मनसे अध्यक्ष सुनील साठे यांनी केली आहे. अन्यथा मनसे स्टाईलने दणका देणार असा इशारा सुनील साठे यांनी दिला.
या संदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम कार्यकारीअभियंता कार्यालयात भेट दिली. तेथे सांगण्यात आले की हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येतो. मग पंचायत समितीमध्ये जाऊन सभापती रमेश सुतार यांची भेट घेतली. त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांशी बोलुन हा दुरुस्त करण्यास सांगतो असे सांगितले. हा रस्ता कुणाच्या ही अखत्यारीत असू दे तो लवकरात लवकर सुस्थितीत करा अन्यथा आम्ही मनसे स्टाईलने आंदोलन करणार असे सुनील साठे यांनी सांगितले. यावेळी मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे, विभाग अध्यक्ष केवल चव्हाण ग्रामपंचायत सदस्य मिलींद शेळके आदी उपस्थीत होते.






Be First to Comment