सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔶🔷
रोहा तालुक्यातील चिल्हे गावाचे रहिवाशी चिंतामणी रामभाऊ महाडिक यांचे आकस्मित निधन झाले.मृत्युसमयी त्यांचे वय ७५ वर्षांचे होते.
त्यांचा स्वभाव प्रेमळ व सर्वांना परोपकारी पडणारे असे सर्वांना परिचित होते.त्यांच्या आकस्मित निधनामुळे महाडिक कुटूंबावर दुःखाचे डोंगर व परिसरात शोककळा पसरली आहे . कोरोनामूळे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोजकेच नागरीक उपस्थित होते परंतु मोबाईलच्या द्वारे त्यांना असंख्य नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली.
चिंतामणी महाडिक हे प्रगतशील शेतकरी व मुक्या जनावरांवर अतिशय प्रेम करणारे तसेच गाई व बैल यांचा उत्कृष्टपणे सांभाळ करणारे व्यक्तिमत्व म्हणून खांब देवकान्हे विभागात सुपरिचित होते. रोहा पंचायत समितीतून कर्मचारी पदावरून पंधरा ते सोहळा वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते तद्नंतर त्यांनी चांगल्या पद्धतीची शेतावर फळझाडांची बागायत तयार करून शेती पूरक व्यवसाय म्हणून उत्तम प्रकारे बागायतीची देखभाल करत आंबे व नारळ कडधान्याचे उत्पन्न घेत होते, वारकरी संप्रदायात वाहून घेतलेले आळंदी पंढरपूर पायी वारी करणारे वारकरी महाडिक यांना अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमाची मोठी आवड होती.तसेच सामाजिक कार्यात नेहमी सक्रीय होते.त्यांनी आपल्या कुटूंबावर तसेच मुलांवर नातवंडांवर चांगले संस्कार केले.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,एक मुलगा,चार मुली, जावई,भाऊ,बहिणी,सून पुतणे,नातवंडे,पतवंडे तसाच मोठा
महाडिक परिवार आहे.
मोठ्या महाडिक परिवारातील जाणते तसेच गावातील थोर विचारवंत चिंतामणी महाडिक यांचे निधन झाल्याने त्यांच्या विषयी सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. महाडिक यांचे दसक्रिया विधि रविवार दि १८ ऑक्टोबर तर उत्तर कार्य विधी सोमवार दि.१९ ऑक्टोबर २०२० रोजी त्यांच्या राहत्या निवास्थानी मौजे चिल्हे येथे होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटूंबिटांकडून प्राप्त झाली आहे,







Be First to Comment