सुधागडातून कार्यकर्त्यांची उपस्थिती 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷
संभाजी ब्रिगेड कोकण विभाग व रायगड जिल्ह्याच्या वतीने भव्य केडर प्रशिक्षण व नियुक्ती कार्यक्रम रविवार दि. 18 ऑक्टोबर रोजी कराडी समाज मंडळ हॉल कामोठे सेक्टर 14 या ठिकाणी आयोजीत करण्यात आला असून कोरोनाच्या काळात शासन नियमांचे पालन करून सदर कार्यक्रम पार पडेल अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
या कार्यक्रमात बहुजन महापुरुषांच्या विचारांचा जागर, भविष्यातील संभाजी ब्रिगेडची पुढील वाटचाल लढाऊ भूमिका व सामाजिक व जनहिताच्या प्रश्नावरील आंदोलने यावर विशेष चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीण दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणाऱ्या या कार्यक्रमास मराठा सेवा संघ महाराष्ट्र्र राज्य कार्याध्यक्ष शिवश्री अमरजीत पाटील, सुधीर भोसले, कोकण विभागीय अध्यक्ष सचिन सावंत देसाई , महाराष्ट्र्र प्रदेश संघटक शिवश्री प्रदीप कणसे, नवी मुंबई विभागीय अध्यक्ष शिवश्री सुभाष सावंत,शिवश्री विश्वनाथ मगर, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष शिवश्री भूषण शिसोदे, शिवश्री स्वप्नील म्हात्रे, आदींची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे.
या कार्यक्रमास पाली सुधागडसह कोकण विभाग व रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.







Be First to Comment