सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । 🔷🔶🔷
एमजीएम रुग्णालयातून कोरोनाबाधीत रुग्णाने पलायन केल्याची घटना घडली असून सदर रुग्णाचा शोध कामोठे पोलीस करीत आहेत.
कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटल येथील कोव्हिड वॉर्डात दाखल असलेला कोरोनाबाधीत रुग्ण राम मुरत (35) हा कोणास काही एक न सांगता संधी साधून रुग्णालयातून पसार झाला आहे. या संदर्भात रुग्णालय परिसरात शोध घेवूनही तो सापडला नाही. त्याचप्रमाणे नातेवाईकांशी संपर्क साधला असता तेथे तो आढळून न आल्याने एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांनी तो पळून गेल्यासंदर्भात कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कामोठे पोलिसांनी त्याच्यावर साथ रोग अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.







Be First to Comment