राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत कु.पार्थ साळुंखे याला डिसिस्टीनशन ! राष्ट्रीय पातळीवर निवड !!! 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । न्हावा शेवा । वार्ताहर । 🔷🔶🔷
उरणच्या साळूंखे कुटूंबियांचा नातू असलेला आणि सानपाड्याच्या रायन इंटरनॅशनल स्कूल या शाळेचा विद्यार्थी असलेल्या कु. पार्थ कैलास साळुंखे याने राज्य स्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याने राष्ट्रीय पातळीवर नामांकन मिळवत राष्ट्रीय पातळीवरही चित्रकलेची ऑनलाईन परीक्षा दिली असून तिचा निकाल येत्या 31 ऑक्टोबर रोजी लागणार आहे.
शाळेत सतत अभ्यासात हुशार असलेल्या पार्थला बुद्धीबळ खेळाचीही विशेष आवड असल्याची माहिती त्याची आई दीपाली यांनी दिली आहे.
लॉकडावूनच्या काळात देशभरात विविध संस्था संघटनांनी अनेक उपक्रम राबविले आहेत.त्यातीलच सेंटर फॉर इंडियन आर्ट रिसोर्सेस अँड ट्रेनिंग या संस्थेच्या वतीने चित्रकला स्पर्धा सर्व शाळांकरिता घेतली होती. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत पार्थ याने राज्यात डिक्सटीशन मिळविले असून त्याची निवड राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी झाली आहे त्या स्पर्धेत ही त्याने भाग घेत आपले चित्र पाठविले असून त्याचा निकाल येत्या 31 ऑक्टोबर रोजी लागणार आहे.







Be First to Comment