महिलेच्या पोटातून काढला तब्बल ६ किलोंचा मांसल गोळा
सिटी बेल लाइव्ह / उरण ( अजित पाटील यांजकडून )
सुमारे तीन चार महिने पोटदुखीच्या त्रासाने वैतागलेल्या एका महिला या रुग्णावर उरणच्या गोसावी रुग्णालयात चाललेल्या सुमारे तीन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या पोटातून सुमारे सहा किलो वजनाचा विनाकारण असलेला ट्युमर काढून टाकण्यात आला आहे. उरण ;शहरातील डॉ . महेश गोसावी यांनी गोसावी हॉस्पिटल उरण येथे ही यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे यामुळे त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर गोसावी यांना धन्यवाद दिले आहेत.या महिला रुग्णाला बीजाणूंचा कर्करोग असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी टाटा रुग्णालयात धाडण्यात आले असल्याची माहिती डॉ. गोसावी यांनी बोलतांना दिली आहे.
सुमारे 40 वर्षे वयाच्या या महीलेच्या पोटात कायम दुखत होते . त्यातूनच त्यांना मासिक पाळी मध्ये 4/5महिन्या पासून अतिरक्त स्त्राव होतं असल्यामुळे पोटाचे सी टी स्कॅन केले असता गर्भाशय ला सूज असून बीजाणू पासून मोठी गाठ असल्याचे दिसून आले त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. त्यांच्या परवानगीनेच करण्यात आलेल्या शस्त्रक्रीये दरम्यान या स्त्री रुग्णाच्या उजव्या बाजूच्या बीजाणू पासून १५ सेमी बाय १० सेमी एवढी मोठी गाठ असल्याचे दिसून आले . त्यामुळे रुग्णाची पूर्ण बीजाणू आणि अंडनलिका काढण्यात आली तसेच पोटातील पाणी तपासणी साठी पाठविण्यात आले. या गाठी च्या हिस्टोपॅथ तपासणीत रुग्णाला अतिशय दुर्मिळ अशा कुकेन बर्ग्स ट्यूमर्स म्हणजेच बीजाणूंचा कर्करोग असल्याचे निदान झाले ज्याचे प्रथम उगमस्थान जठरा पासून होते. त्यामुळे रुग्नाला पुढील उपचारासाठी केमोथेरॅपी आणि रेडिएशनची आवश्यकता असल्याने या रुग्ण महिलेला टाटा कॅन्सर हॉस्पिटलला पाठविण्यात आले.असल्याची माहिती डॉक्टर गोसावी यांनी बोलताना दिली आहे. डॉ . गोसावी रुग्णालयात यापूर्वी ही यासारख्याच अनेक जटील शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉक्टर महेश गोसावी यांनी बोलतांना दिली आहे. …






Be First to Comment