गव्हाण जिल्हा परिषद विभागातील सिडको संबंधित समस्या सोडविण्याची केली मागणी 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । उलवे । 🔷🔶🔷
आदरणीय नामदार, आदितीताई तटकरे सो, राज्यसभा महाराष्ट्र राज्य तथा पालक मी रायगड यांसी.
रायगड जिल्हा परिषद पनवेल तालुका गव्हाण विभाग सिडको प्रकल्प बाधित क्षेत्रातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा शेलघर, बामणडोंगरी, मोरावे, जावळे, न्हावे आणि बेलपाडा हया गावातील रायगड जिल्हा परिषद शाळेसाठी सिडकोकडून भुखंड, क्रिडांगणासाठी जागा, समाजमंदिर तसेच ज्या गावांमध्ये सुलभ सौचालय आणी जलकुंभाची आवश्यकता आहे त्या गावासाठी जलकुंभ बांधुन देण्याची मागणी रायगड जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील यांनी रायगड च्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली.

तसे मागणीपत्र पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यवस्थापकीय संचालक सिडको हयांच्याकडे द्यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांतर्फे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील यांनी केली.







Be First to Comment