सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔶🔷
नागोठण्याजवळील सुकेळी आदिवासी वाडी येथील रहिवासी भाजपा अनुसुचित जमाती मोर्चा रायगड जिल्हा अध्यक्ष नामदेव वाघमारे याचे मामा, आदिवासी समाजाचे नेते, आधार फाउंडेशन संस्थेचे उपाध्यक्ष बबन लक्ष्मण कापरे यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी मंगळवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी कामोठे (पनवेल ) येथील एम. जी. एम. हॉस्पिटल येथे पहाटे पाच वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
कै. बबन कापरे यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांची दशक्रिया विधी गुरुवार दि. २२ ऑक्टोबर रोजी व उत्तरकार्य रविवार दि. २५ ऑक्टोबर राहत्या घरी होणार असल्याची माहिती नामदेव वाघमारे यांनी दिली आहे.
कै. बबन कापरे यांनी आधार फाउंडेशनच्या माध्यमातून आदिवासी समाजामध्ये जनजागृती, शिक्षणाचे महत्व, जातीचे दाखले, रेशन कार्ड , गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना मदत, आदिवासी तरुणांना रोजगार, आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या माध्यमातून आलेल्या योजनाची माहिती, योजना कशा राबविल्या जातात यांची माहिती देऊन तरुणांना तसेच बेरोजगार आदिवासी बांधवांना व्यवसायासाठी अनेक योजना मिळवून देणे राज्य शासन व केंद्र शासन यांच्या योजनांची माहिती देऊन त्या योजना मिळवून देणे, आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन करणे आदी उपक्रम राबविले आहेत. तसेच कै. बबन कापरे यांनी आधार फाउंडेशनच्या माध्यमातून कोविड -१९ मधील लॉकडाऊनच्या कालावधी रोहा तालुका व सुधागड तालुक्यातील २०५० आदिवासी कुटुंबियांना धान्याचे किट व मास्क जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.







Be First to Comment