सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔶🔷🔶
महाराष्ट्र राज्य कराडी समाजाचे अध्यक्ष व उरणचे माजी नगरसेवक सुनील कोटकर यांचे आज वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्यावर कोटनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
सुनील कोटकर यांना आज सकाळी ७ वाजता हृदयविकाराच्या झटका आला. त्यांना त्वरित दवाखान्यात नेण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांची प्राणज्योत आधीच मावळली होती. सुनील कोटकर हे महाराष्ट्र राज्य कराडी समाजाचे अध्यक्ष होते. तसेच उरण नगरपालिकेचे माजी नगरसेवक होते.
कोरोना महामारी व वादळात त्यांनी अनेक समाजबांधवांना मदतीचा हातभार दिला, असे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सुनील कोटकर यांच्या अचानक जाण्याने समाजाची मोठी हानी झाली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील, भाऊ, भावजय, बहीण, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर कोटनाका स्मशानभूमीत अनेक मान्यवरांच्या उपस्थित अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.
दुखवट्या निमित्त चहापाणी गुरुवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. दिवसकार्य गुरूवार दि. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता राहत्या घरी उरण कोटनाका आंनद हॉटेल समोर करण्यात येणार असून याप्रसंगी कोणत्याही प्रकारचा दुखवटा स्वीकारला जाणार नसल्याची माहिती कोटकर कुटूंबियांनी दिली.







Be First to Comment