चिल्हे गावासह विभागात शोककळा 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड ।विश्वास निकम । 🔷🔶🔷
रोहा तालुक्यातील खांब देवकान्हे विभागातील मौजे चिल्हे गावचे सुपुत्र तथा सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रात नेहमी सक्रिय सहभाग घेणारे तरुण तडफदार युवा पिढीचे मार्गदर्शक प्रकाश बापू महाडिक यांचे अचानक आकस्मित मृत्यू झाल्याने झाल्याने सर्वानाच धक्का बसला असून महाडिक परिवार व चिल्हे गावावर दुःखाचे डोंगर तसेच खांब देवकान्हे विभागात शोककळा पसरली आहे.
कुशल कर्तबगार सर्वांशीस समभावनेने वागणारा मेहनती शांत मनमिळाऊ आणि सर्वच कामात हिरहीरीने पुढाकार घेणारा उच्चशिक्षित तरुण होतकरु असा गावातील सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय प्रकाश उर्फ लाडका ” भाऊ ” वय वर्ष ४७ याचा अचानक हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
नेहमी सर्वांचीच मने जिंकणारा भाऊ यांना अचानकपणे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ पुणे येथील सिंम्बोसेस येथील हस्पिटलात उपचारासाठी हलविण्यात आले असता दरम्यान त्यांचे निधन झाले. आपल्यातून निघून गेल्याने चिल्हे गावासह परिसरातील साऱ्यांचेच अश्रू अनावर झाले असून परिसरात दुःखमय शोककळा पसरले आहे.
प्रकाश महाडिक हे नववी दहावी शिक्षण घेत असतानाच तीन भावनडांची आई वडिलांची सावली हरपली तद्नंतर त्यांच्या पच्छात एकमेकांना धीर देत स्वतःचे दहावी बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून धाटाव औद्योगिक क्षेत्रातील नामवंत असलेल्या आर डी सी कंपनीत कार्यरत झाले दोन भावांचे शिक्षण स्वतःचे कुटूंब सांभाळत त्यांचे देखील कुटुंब स्थिर केले कारखान्यातील जबाबदारी सांभाळत सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात अग्रेसर काही वर्षे गाव कारभारात खजिनदार म्हणून कार्यकाळ केले तसेच ग्राम पंचायतीचे माजी सदस्य होते हरीपाठ भजन कीर्तनाची मोठी आवड गाव कारभार मोठे योगदान असणारा व युवकांना नेहमी प्रोत्साहित करणारा भाऊ यांचे निधन असून त्यांचे अंत्यसंस्कार कोरोना पादुर्भावामुळे पुणे येथील येथील औदं वैकुंठ धाम येथे करण्यात आले.
यावेळी कोरोना पार्श्वभूमीवर येथील नागरिकांनी अतिदक्षता बाळगत अंत्यसंस्कार करण्यात आले तसेच यावेळी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो यासाठी सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली.तसेच अनेकांनी मोबाईलद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली.
त्यांच्या पच्छात त्यांची पत्नी,दोन मुली, दोन भाऊ ,भावजय पुतणे, पुतनी,आत्या ,चुलते चुलती,मोठा महाडिक परिवार असून त्यांचे पुढील दशक्रिया विधी शुक्रवार ता.१६ ऑक्टोबर रोजी व उत्तरकार्य सोमवार ता. १९ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी मौजे चिल्हे या ठिकाणी होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटूंबियांकडून प्राप्त झाली आहे,







Be First to Comment