वासांबे मोहोपाडा हद्दीत कोरोनाचा कहर सुरुच : आज तहसिलदारांसह माजी आमदार रसायनीत
सिटी बेल लाइव्ह / रसायनी / राकेश खराडे #
कोरोना (कोविड-19)या विषाणूने जगभर थैमान घातल्याने सर्वंत्र हाहाकार माजला आहे.महाराष्ट्र राज्यातही कोरोना रुग्णांचा आलेख वाढताच आहे. कोरोना या विषाणुची सर्वंत्र भिती असली तरी नागरिक गंभीर दखल घेताना दिसत नसल्यानेच कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याचे दिसून येते. रसायनीत परीसरातील वासांबे मोहोपाडा परीसरात कोरोनाने शिरकाव करुन भयभीत वातावरण निर्माण झाले आहे.
वासांबे मोहोपाडा हद्दीत कोरोनाचा फैलावर वाढून मंगळवारी नव्याने नऊ जणांचे कोरोना अहवाल पाॅजिटीव्ह आले असून वासांबे मोहोपाडा हद्दीत एकूण 130 व्यक्ती कोरोनाने बाधित झाले आहेत. बुधवारी सायंकाळी उशिरा नवीन पोसरीतील 7 जणांचे अहवाल पाॅजिटीव्ह आले आहेत तर रिस मध्ये 2 व्यक्तींचे अहवाल पाॅजिटीव्ह आले आहेत.
रसायनीत कोविड सेटंर उभारण्याची गरज निर्माण झाली असून संबंधित ग्रामपंचायत व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी विचारविनिमय करून राजकारण न करता एकत्रित येण्याची गरज निर्माण झाली आहे.यासाठी माजी आमदार मनोहर भोईर यांनी नागरिकांची व पत्रकारांची मागणी लक्षात घेऊन नामदार राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करुन खाने आंबिवळी येथील गेस्ट हाऊसची ,एनआयएसएम सेबी, तसेच परीसरातील काही रुग्णालयांची निवड केली असून मंगळवारी दुपारी पाहणी करण्यासाठी तहसिलदार, वैद्यकीय पथकासह माजी आमदार मनोहर भोईर रसायनीत येत आहेत.कोविड सेटंरसाठी निवड केली असून आज मंगळवारी दुपार.यानंतर पुढील यंत्रणा लवकरच ठरणार आहे.जसे खोपोलीत डॉ मोहिते यांनी खाजगी हाॅस्पिटलमध्ये आॅक्सिजन व व्हेटीलेटरची व्यवस्था करुन कोरोना रुग्णांसाठी हाॅस्पिटल सुरू केले.त्याचप्रमाणे मोहोपाडा हद्दीतही सुरू व्हावेत अशी रसायनी कर मागणी करत आहेत.
नागरिकांनी सोशल डिस्टींगशनचे पालन करुन आपली स्व:ताची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन होत आहे.रसायनीकरांनो आतातरी सावध व्हा! विनाकारण घराबाहेर पडणे टाला,सोशल डिस्टसिंगचे तंतोतंत पालन करा असे आवाहन पुन्हा पुन्हा करण्यात येत आहे.






Be First to Comment