Press "Enter" to skip to content

बेंगळूरु चा तिखट मारा,कोलकाता ला 82 धावांनी नमवले.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सोमवारी (१२ ऑक्टोबर) आयपीएल २०२०चा २८वा सामना झाला. फलंदाजीसाठी सोईस्कर असलेल्या शारजाह क्रिकेट स्टेडियमवर हा सामना पार पडला. बेंगलोरने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मर्यादित २० षटकात २ विकेट्स गमावत १९४ धावांचा स्कोर उभारला. प्रत्युत्तरात कोलकाता संघ ११२ धावाच करु शकला. त्यामुळे बेंगलोरने ८२ धावांच्या फरकाने सामना जिंकला.

बेंगलोरच्या १९५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताच्या कोणत्याही फलंदाजाला जास्त चांगली कामगिरी करता आली नाही. शुबमन गिलने कोलकाताकडून २५ चेंडूत सर्वाधिक ३४ धावा केल्या. उर्वरित फलंदाजांना बेंगलोरच्या गोलंदाजांनी २० धावांच्या आतच गुंडाळले.

बेंगलोरकडून गोलंदाजी करताना ख्रिस मॉरिस आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. सोबतच नवदीप सैनी, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, इसुरु उडाना यांनीही कोलकाताच्या एक-एक फलंदाजाला तंबूत धाडलं.

तत्पूर्वी बेंगलोरकडून एबी डिविलियर्सने सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली. त्याने ३३ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकार ठोकत ही उल्लेखनीय धावसंख्या गाठली, तर ऍरॉन फिंच (४७ धावा), देवदत्त पड्डीकल (३२ धावा), विराट कोहली (३३ धावा) यांनीही संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले.

कोलकाताच्या गोलंदाजांना जास्त चांगली कामगिरी करता आली नाही. केवळ आंद्रे रसेल आणि प्रसिद्ध कृष्णा हे प्रत्येकी १ विकेट घेऊ शकले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.