कंपनी व्यवस्थापनाने आपली भूमिका बदलली नाही तर संघर्ष अटळ – अनिरुद्ध भोईर 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । प्रतिनिधी । 🔶🔷🔶

अमृत मिल्क ही कंपनी दोन वर्षांपूर्वी पडघे गावातील शेतक-याच्या जमिनावर उभी करण्यात आली कंपनी उभी करण्यापुर्वी या कॉपनीतील कामगार भरती ही येथील प्रकल्पग्रस्तांमधून केली जाईल अशी आश्वासने कंपनी व्यवस्थापनाने दिली होती पण नोकर भरतीत कंपनी व्यवस्थापनाने येथील स्थानिकांना डावळून परप्रांतीयांची भरती केली आहे. या मजोर कंपनी प्रशासना विरोधात सर्व पक्षांनी आपले हेवेदावे बाजूला ठेवून आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेना सल्लागार बबन पाटील व अऩ्य नेत्याच्या नेतृत्वाखाली कंपनीवर धडक मोर्चा काढला होता. त्यावेळी त्यांनी येथील स्थानिकांचा पहिला विचार केला जाईल असे आश्वासन दिले होते. पण कंपनी व्यवस्थापनाने न जुमानता येथील स्थानिकांना डावळून नोकर भरती सुरू केल्याने येथील स्थानिकांनी मनसेच्या नेतृत्वाखाली कंपनीवर धडक मोर्चा काढला त्यावेळी कंपनी प्रशासनाने स्थानिकांना नोकरीत समावून घेतले जाईल हेच आश्वासन दिले होते. तरीही कंपनी व्यवस्थापनाने आपली मजोरी करत परप्रांतीयांची भरती सुरू ठेवली आहे.

शासनाच्या नियमा प्रमाणे ८० टक्के स्थानिकांचीच नोकर भरती करण्यात यावी असा जीआर असताना त्याची पा़यमलमी करताना अमृत मिल्क कंपनीच्या मजोर प्रशासनाने ज्या शेतक-याच्या जमीनीवर कंपनी उभी आहे त्या पडघे गावातील स्थानिक तरूणाना डावळून परप्रांतीयांची भरती केली आहे. गेली २ वर्षापासून अमूल मिल्क कंपनी विरोधात स्थानिक भूमिपुत्र संघर्ष करतोय तरी सुद्धा स्थानिक भूमिपुत्रांना त्या ठिकाणी प्राधान्य दिल जात नाही.
कंपनीकडून परप्रांतीय कामगार भरण्यात आलेले आहेत स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय करत त्यांना उध्वस्त केले जात आहे. अमुल व्यवस्थापनाने आपली आडमुठी, बेकायदेशीर, समस्त प्रकल्पग्रस्तांवर आणि स्थानिकांवर अन्याय करणारी भूमिका बदलली नाही, तर मात्र संघर्ष अटळ असून याची जबाबदारी व्यवस्थापनाची असेल, असा गर्भित इशारा सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध भोईर यांनी दिला आहे.







Be First to Comment