सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम ) #
कोलाड-रोहा मार्गावर पहिल्याच पावसात अक्षरशः दैनी अवस्था उडाली असून हा मार्ग जणू मृत्यूचा सापळा बनला असुन या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
या महिन्यात कोसळलेल्या पावसात या मार्गाची मोठी दयनीय अवस्था उडाली असून वाहन चालकांची वाहन चालवताना मोठी दमछाक होत असून तारेवरची कसरत करत वहाने चक्क हेलकांडे घेत आहेत. तर रोहे नगरीच्या नजीकच्या वरसे स्टॉप ते कोलाड हा रस्ता पूर्णतः खड्डेमय झाला आहे.
मुबंई गोवा महामार्गावर कोलाड आंबेवाडी नाक्याच्या भर चौकात मुख्यरहदरीच्या ठिकाणी गटार लाईच्या कामासाठी रस्ता खोदले असल्यानं या ठिकाणी या कामाची दिरंगाई प्रवासी वर्गाला धोकादायक ठरत असून अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक दिवसांपासून या मार्गावर एच पी पेट्रोल पंप समोर ,एक्सल स्टॉप,जैन वाडी स्टॉप,धाटाव,सुदर्शन,बारसोळी, किल्ला,कृषी विद्यापीठ, पाले ,संभे,या ठिकाणी हे खड्डे मोठे आपघाच्या खुणा करीत आहेत तर वरसे ते आंबेवाडी या दरम्यान रस्तात खड्डे की खड्ड्यात रस्ता आहे हे चालकांच्या लक्षातच येत नाही त्यामुळे आपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे,गेली अनेक दिवसांपासून पडलेले हे धोकादायक खड्डे दिवसंदिवस प्रवाशी नागरिकांच्या जीवावर वेतले असल्याचे दिसून येत आहेत.
या मार्गावरून प्रवास करतांना प्रवाशांना आपला जिव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे तर या मार्गावरून प्रवास करतांना या खड्यांचा अंदाज करता येत नाही या भयानक पडलेल्या खड्यांमुळे प्रवाशी वर्गाच्या जिवाचा जणु खेळ चालला असल्याचे दिसत आहे. या मार्गावर शाळा कॉलेज,धाटाव एम आय डी सी,तहसिलदार ऑफीस, दवाखाने,व रोहा कोलाडकोलाडसारखी मोठी बाजापेठ असल्याने या मार्गावरुन दररोज असंख्य नागरिक प्रवास करीत असतात मात्र कोरोना संकटात शाळा कॉलेज बाजारपेठ लॉक आउट मध्ये बंद असल्याने रिक्षा,व एसटी बसेच बंद आहेत जड अवजड वाहनांची वाहतूक बंद केवल औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांचा प्रवास या मार्गावरून होत आहे तरी देखील या मार्गावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत,
औद्योगिक क्षेत्रात ये जा करीत असलेल्या नागरिकांना प्रवास करतांना एखाद्या होडीचा झोका याचा आनंद तर दुसरा मोठा धोका असल्याचे वाटत आहे.तर टूव्हीलर वरुन प्रवास करतांना या खड्डयातुन प्रवास करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.तर कामावर जाणारा कामगार या खड्डया मुले वेळेवर कामावर पोहोचेल याची खात्री देता येत नाही.या मार्गाची डागडुजी मागील वर्षी केली परंतु पाऊस पडताच या मार्गावर जणु खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले पावसाच्या पाण्याने खड्डे भरल्यामुळे दिसेनासे होत आहेत त्यामुळे या मार्गावर छोटे मोठे अपघात होत असतात यामुळे प्रवाशी वर्गाच्या जिवाला नेहमी धोका निर्माण होतो.यामुळे संबंधितानी याकडे लक्ष देऊन या रस्त्याचे काम करावे अथवा तात्पुरता याची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.






Be First to Comment