ग्रामस्थांनी मानले आमदार गाेगावले,विद्युत वितरण कंपनी व ठेकेदारांचे आभार !

सिटी बेल लाइव्ह / माणगांव /प्रतिनिधी #
संपुर्ण निसर्ग चक्रीवादळ आपत्ती नंतर माणगांव तालुक्यातील माेर्बा गांव वजा शहरामध्ये मोर्बा गावामध्ये बरोबर ३८ दिवसा नंतर वीज पुरवठा सुरळीत झाला. या गावांमध्ये विद्युत पुरवठा सुरळित हाेताना अनेक अडचणी समाेर येत हाेत्या परंतु काही दिवसानंतर गावातील हाेतकरु तरुण ग्रामस्थ, समाजसेवी संस्था ह्यांनी महत्वाची जबादारी सांभाळली त्याचप्रमाणे माेर्बा शिवसेना शाखाप्रमुख मन्सुर जाफर यांनी महाड पाेलादपुर माणगांवचे आमदार भरतशेठ गाेगावले यांना संपर्क करुन वीजपुरवठा सुरळित करण्यासाठी मदत मागितली व गाेगावले यांनी सढळ हस्ते माेर्बा शहरातील काही प्रभागात मदत पुरविली.या सर्व लाेकांच्या सहकार्यामुळे माेर्बा शहर पुन्हा 100% विद्युत प्रकाशित झाले.
आमदार भरतशेठगोगावले व
महावितरणचे ऑफिसर मोरे व
साईरुद्रा कंपनी चे मालक शुभम मगर व त्यांच्या टीम चे व सर्व कामगारांचे व
मोर्बा रिक्षा युनियन व
मोर्बा,सुरले,बोर्ले, नाईटने, महादपोली च्या ज्या लोकांनी या कामाला वेळेनुसार सहकार्य केले यांना माेर्बा शाखाप्रमुख मन्सुर जाफर यांनी आभार व्यक्त केले आहेत. याच प्रसंगी माेर्बा गावात वीज पुरवठा सुरळित करणात स्थानिक प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायतीसह आमदार खासदार अपयशी ठरले आहेत आज सुरळित झालेला वीजपुरवठा,माेर्बा ग्रामस्थ,रिक्षा युनियन,सामाजिक संस्था,वितरण कंपनी,ठेकेदार व आमदार भरतशेठ गाेगावले,यांच्या सहकार्यानेच झाला असल्याचे प्रतिपादन मन्सुर जाफर यांनी पत्रकारांशी बाेलताना केले आहे.






Be First to Comment