Press "Enter" to skip to content

मुंबई इंडियन्स ने दिल्ली ला नमवले

सलामीवीर क्विंटन डि कॉक (53) आणि सूर्यकुमार यादव (53) धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला सहज पराभूत केले. धावांचा पाठलाग करताना फलंदाजीवेळी क्विंटन डिकॉक माघारी फिरल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या भात्यातील फटकेबाजी पाहायला मिळाली. त्याने 32 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार खेचत 53 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील 17 व्या षटकात दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन आणि अष्टपैलू स्टॉयनिस यांच्यातील ताळमेळ ढासळल्याचे पाहायला मिळाले.

राहुल चाहर घेऊन आलेल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर स्टॉयनिसनं फटकावलेला चेंडू अडवताना सूर्यकुमार गोंधळल्याचे पाहायला मिळाले.

त्याचा फायदा उठवण्याच्या इराद्याने धवन-स्टॉयनिस जोडीनं दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. धवन चेंडूकडे पाहत होता. पण स्टॉयनिस दुसरी धाव घेण्यासाठी निघून आला होता.

क्षेत्ररक्षणात झालेल्या गडबडीतून सावरत सूर्यकुमारनं चेंडू राहुल चाहरकडे फेकला आणि दिल्लीच्या संघातील मोठा मासा मुंबई इंडियन्सच्या गळाला लागला. 7 चेंडूत 12 धावा करणाऱ्या स्टॉयनिसला मैदान सोडावे लागले. तो धावबाद झाला नसता तर त्याच्या भात्यातून फटकेबाजी पाहायला मिळाली असती. मुंबई इंडियन्ससाठी स्टॉयनिसच्या रुपात मिळालेली विकेट मोठी होती. त्याच्यामध्ये मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. त्याची विकेट पडल्यामुळे दिल्लीची धावसंख्या नियंत्रणात ठेवण्यात मुंबईला फायद्याची ठरली.

त्याची विकेट पडल्यानंतर धवनने यष्टिरक्षक कॅरीसोबत खेळ पुढे सुरु ठेवत संघाला 162 धावांपर्यंत पोहचवले. हे आव्हान मुंबईने 5 गडी राखून पूर्ण केले. केरॉन पोलार्ड 14 चेंडूत नाबाद 11 धावा आणि कृणाल पांड्या नाबाद 12 धावा करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दिल्लीकडून रबाडाने सर्वाधिक 2 तर अश्विन, अक्षर पटेल आणि स्टॉयनिस यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

हैदराबाद आणि राजस्थान मधला सामना उत्कंठा वाढवणारा झाला.अटीतटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ने सरशी साधली.

रविवार झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्स संघाने विजयश्री अक्षरशः खेचून आणली आणि सनरायझर्स हैद्राबाद संघाचा 5 विकेट्सने पराभव केला. राजस्थानच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला तो राहुल तेवतिया आणि रियान पराग या जोडीने. दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद भागीदारी केली आणि 159 धावांचे आव्हान पार करून दिले.राहुलने 45 आणि परागने 42 धावांची खेळी. या विजयानंतर रियान परागने मैदानातच ठेका धरला.

शारजाह : कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) संघ सोमवारी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्धच्या( आरसीबी) लढतीत कामगिरीत सातत्य राखण्याच्या निर्धाराने उतरेल.

केकेआर व आरसीबी या दोन्ही संघांची मुख्य अडचण फलंदाजी आहे. केकेआरतर्फे सुनील नारायणच्या स्थानी डावाची सुरुवात करणाऱ्या राहुल त्रिपाठीने सीएसकेविरुद्ध ८१ धावांची खेळी केली, पण पंजाबविरुद्ध मात्र तो अपयशी ठरला. आरसीबीतर्फे सलामीवीर फलंदाज देवदत्त पडीक्कलचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.