सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔶🔷🔶
जनवादी महिला संघटनेच्या उपाध्यक्षा, माजी कोषाध्यक्षा सुवर्णाताई हसुराम मोकल यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले.
सुवर्णाताई मोकल जनवादी महिला संघटनेच्या धडाडीच्या कार्यकर्त्यां होत्या. शांत आणि मनमिळावू मितभाषी होत्या. चिरनेर भागातील महिलांवरील अत्याचाराचे प्रश्न, रेशनचा प्रश्न, आदिवासी वाडयांवरचे जातीच्या दाखल्यांचे प्रश्न, दवाखान्यात दाखल करण्यासाठी मदत करणं, दारूबंदी अशा अनेक ठिकाणी त्यांचा हिरारीने सहभाग असत. कामगारांच्या संपाला पाठिंबा, अनेक वेळा जनतेच्या विविध प्रश्नांवर, एसईझेडच्या प्रश्नांवर दिल्ली पर्यंत महिलांना एकत्र करून मोर्चा घेवून जाण्याचं काम केलं.
सुवर्णाताई कवयित्री होत्या महिलांच्या समस्यांवरील कविता लिहून त्यांच्या शैलीत गाणं गात असत. बेटी हूं मैं बेटी, मैं तारा बनुंगी हे गाणं खूप छान बोलत, सावित्रीबाई फुलेंची ओवी, पोवाडा त्या गात असत. अशा होतकरू सुवर्णाताई मोकल यांच वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे.
त्यांच राॅकेलच सरकारमान्य दुकान होतं परंतु ते दुकान त्यांनी सेवाभाव म्हणूनच चालविला. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या सुवर्णाताई मोकल या़च्यां अचानक जाण्यान पक्ष आणि जनसंघटनांची पोकळी भरुन येवू शकणार नाही असा विश्वास जनवादी महिला संघटनेने व्यक्त केला.








Be First to Comment