बाजार समितीच्या भाजी विक्रेत्यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
सिटी बेल लाइव्ह / पनवेल #
पनवेल महानगरपालिकेने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारांवर लावलेले निर्बंध हटवावेत आणि येथील व्यवहार सुरळीत करावेत अशी मागणी बाजार समितीतील भाजीविक्रेते व्यापार्यांनी महानगरपालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यवहार दिनांक ३०/०६/२०२० पासून बंद आहेत. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्यांची गैरसोय होत आहे, तसेच पनवेल मध्ये येणारे भाजीची आवक बंद असली तरी काही लोक अव्याच्या सव्वा १० पटी च्या भावाने भाजीपाल्याची विक्री करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचे हाल होत आहेत. तसेच आपल्या पनवेल तालुक्यातील स्थानिक शेतकरी यांचा माल अक्षरशः सडून चाललेला आहे. वरील सर्व परिस्थितीचा विचार होवून पनवेल कृषि उत्पन्न बाजार समिती मधील भाजीपाल्याचा व्यवहार चालू करावा. आम्ही कोविड-१९ चा प्रादुर्भाव होवून नये म्हणून सर्व नियमांचे पालन करून व्यवसाय करायला तयार आहोत.
हे निवेदन भाजीपाला व्यापारी रमाकांत हाशा गरूडे, मनोहर गणपत मुंबईकर, दिपक अच्छेलाल सोनकर, प्रशांत दामोदर गाडे, दिनेश ज्ञानेश्वर महाडीक, शैलेश नेबूलाल कानू, मयुर कराळे, सागर गजानन चव्हाण यांनी दिले आहे.






Be First to Comment