Press "Enter" to skip to content

कधी येणार कोविड ची लस???

जगभरात कोरोना व्हायरसच्या लसीच्या चाचण्या सुरू आहेत. या दरम्यान कोरोनाच्या लसीबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी एक सकारात्मक माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख एडनॉम गेब्रियेसस यांनी सांगितले की, एक सुरक्षित आणि परिणामकारक लस या वर्षाच्या शेवटापर्यंत येऊ शकते. यासोबतच जागतिक आरोग्य संघटनेनं सगळ्या नेत्यांना लसीचे समान वितरण करण्यासाठी आवाहन केलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी बोर्डाच्या बैठकीत टेड्रोस यांनी सांगितले की, ”सध्याच्या माहामारीत आपल्याला लसीची आवश्यकता असून लवकरात लवकर म्हणजेच या वर्षाच्या शेवटी कोरोनाची लस उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी एकजूटीने राहून व्हायरशी लढण्यासाठी पुरेपूर उर्जेचा वापर करायला हवा.” जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या ग्लोबन लस फॅसिलीटीच्या ९ प्रायोगिक लसी या निर्मिती प्रक्रियेत आहेत.

कोरोना आणि थंडी

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मार्च महिन्यात भारतात मोठ्या प्रमाणावर व्हायला सुरवात झाली. यावेळी येऊ घातलेल्या उन्हाळ्यातील उष्णतेचा व्हायरसवर परिणाम होईल आणि तो निष्क्रिय होईल, असे काहीसे तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र, त्यानंतरच्या काळातही कोरोनाचा हाहाकार तसाच सुरु राहीला. सध्या उत्तर आणि दक्षिण गोलाधार्थ हवामानामध्ये बदल घडताना दिसून येतोय. थंडी हळूहळू वाढू लागली आहे. प्रश्न हा आहे की थंडीच्या दिवसात कोरोना व्हायरसचे स्वरूप काय असेल? खरंतर जागतिक आरोग्य संघटनेने हे आधीच स्पष्ट केलं आहे की, हवामानातील बदल हे व्हायरच्या स्वरुपावर आणि त्याच्या कामगिरीवर काहीह प्रभाव टाकू शकणार नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.