Press "Enter" to skip to content

सुस्साट गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई चा ब्रेक…

30 दिवसात अतिवेगाने वाहन चालविणा-या 10115 वाहनांवर कारवाई 🔶🔷🔶

महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांचे वतीने करीत वाहनचालकांचे मोठया प्रमाणात प्रबोधन 🔷🔶🔷


सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । 💠🌟💠

राज्यातील महामार्गांवर अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरीता भुषण उपाध्याय अप्पर पोलीस महासंचालक वाहतुक महाराष्ट्र राज्य मुंबई, यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे विजय पाटील, पोलीस अधीक्षक (मुख्यालय) व डॉ.दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र ठाणे तसेच सुदाम पाचोरकर पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सुभाष पुजारी, महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांचे वतीने मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर होणा-या अपघातांचे मुख्य कारण वेग मर्यादेचे उल्लंघन असल्याचे निष्पन्न झाल्याने विहीत मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणा-या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पळस्पे पोलीस मदत केंद्राकडील अधिकारी कर्मचारी यांनी कंबर कसली आहे.

अप्पर पोलीस महासंचालक भुषण उपाध्याय यांचे आदेशाप्रमाणे चालकांचे प्रबोधन व बेशिस्त चालकांवर कारवाई अशी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत माहे सप्टेंबर 2020 मध्ये इंटरसेप्टर वाहनादवारे व मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वेगवेगळया ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामार्फत अतिवेगाने वाहन चालविणा-या 10115 वाहनांवर कारवाई करण्यात आली व सीट बेल्ट न लावणे , मोबाईल संभाषण, लेन कटींग, काळया काचा, रिफलेक्टर नसलेल्या 8010 वाहनांवर अशा एकुण 18125 वाहनांवर कारवाई करण्यात आली.

महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे कडुन अपघात कमी व्हावे तसेच वाहनचालकांमध्ये वाहतुक नियम व नियमनाबाबत जनजागृती व्हावी याकरीता वेळोवेळी चौकसभा आयोजीत करुन वाहन पर्किंग स्थळे, कळंबोली ट्रक टर्मीनल, लॉजीस्टीक्स येथे कार्यकम घेवुन वाहतुक नियमांबाबतच्या माहितीबाबतची पत्रके वाटण्यात येतात तसेच वाहतुक नियंमांचे उल्लंघन केल्यामुळे होणा-या अपघाताबाबत माहिती देवुन अपघातसमयी मदत करण्याबाबत सुचना करण्यात येतात.

वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यास करण्यात येणा-या दंडात्म्क कारवाईबाबतची माहीती देवुन वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात येत असते असे महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे सहा.पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.