सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहा (नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील घोसाळे गवळवाडी गावच्या लक्ष्मीबाई भागोजी घोसाळकर यांचे मंगळवार दि.०७ जुलै रोजी वृद्धापकाळाने वयाच्या ८७ व्यां वर्षी राहत्या घरी दुःखद निधन झाले.
यादव चौळी गवळी समाजाचे माजी सदस्य सामाजिक कार्यकर्ते कृष्णा भागोजी घोसाळकर यांच्या त्या मातोश्री होत. अतिशय प्रेमळ,परोपकारी व मनमिळाऊ,सरळ साध्या स्वभावाने सर्वांनाच परिचित होत्या.आज त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या अंत यात्रेला रोहा ग्रामीण विभागसह घोसाळे पंचक्रोशी विभागतील यादव चौली गवळी समाज बांधव,राजकीय,सामाजिक,तसेच शैक्षणिक,विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सध्या कोरोना व्हाईरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे,तीन मुली,सूना,जावई,नातवंडे, पतवांडे असा मोठा परिवार आहे..त्यांचे दशक्रिया विधी गुरुवार दि.१६ जुलै तर अंतिम धार्मिक विधी तेरावे रविवार दि.१९जुलै २०२० रोजी राहत्या घरी घोसाळे येथे होतील असे त्यांच्या निकवर्तीयांनी कळविले आहे.






Be First to Comment