राष्ट्रीय महामार्ग बनविणाऱ्या चेतक इंट.कंपनीच्या प्लँटच्या दारातच खड्डे,खडी व ग्रीट
सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष घालावे – माणगांवकर नागरिकांची मागणी
सिटी बेल लाइव्ह / प्रमाेद जाधव/माणगांव.
मुंबई गाेवा महामार्गाचे काम करणारी चेतक इन्टरप्रायझेस कंपनीचे स्टाेन क्रेशर प्लांट व ,मटेरीयल डेपाे व लाेकल मँनेजमेंट आँफीस हे माणगांव शहरानजिक दत्तनगर पासुनच पुढे पुणे दिघी महामार्ग (निजामपुर राेड) लगतच आहे सदर प्लांटमधुन कंपनीच्या वेगवेगळ्या साईटवर मटेरीयल पाेहचविणे,डिझेल ,पाणी, खडी,ग्रीट सिमेंट सर्व वाहतुक याच मार्गावरुन हाेत असते तसेच यामार्गावरुन पुणे (ताम्हीणीमार्गे) शिर्डी नगर अश्या ठिकाणाची वाहतुक सुरु असते तसेच माणगांव तालुक्याच्या विस्तार हा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यापर्यंत असल्यामुळे तालुकांतर्गत वाहतुक देखील याच महामार्गावरुन हाेत असते याच महामार्गावर चेतक कंपनीच्या राष्ट्रीय महामार्ग (माणगांव बायपास) चे काम चालु आहे व ब्रिजचे काम देखील सद्यस्थितीत असलेल्या पुणे दिघी मार्गाच्या मधाेमध आणि चेतक कंपनी कार्यालयाच्या प्रवेशद्वार (इंट्री) वरच आहे या ठिकाणी राज्यमार्गावर माेठा खड्डा निर्माण झाला आहे साेबतच 2 नंबर खडी व ग्रीट इतरत्र पसरले आहे हा खड्डा चेतक कंपनींची डंपर वाहतुक व रस्त्यावरील उड्डाणब्रीजचे काम यामुळे निर्माण झाला असल्याचे नागरीकांचे मत आहे यामुऴे माणगांव शहरातील निजामपुर राेडवर भयानक अपघात हाेऊ शकतात असे माणगांव शहरातील जाणकार नागरिकांचे मत आहे याकरीता माणगांव तालुका प्रशासनासाेबत सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष केंद्रीत करुन याेग्य कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिक नागरिंकाकडुन हाेत आहे.






Be First to Comment